कराड प्रतिनिधी ( सुप्रिया कांबळे ) : ढेबेवाडी विभागातील अति दुर्गम भागातील मौजे जिंती,शिंदेवाडी, धनावडे वाडी,या ठिकाणी झालेल्या नुकसानीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दौरा केला यावेळी दहा-बारा दिवस उलटूनही अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळून खूप हानी झाली होती तसेच गावामध्ये पावसाचे पाणी घुसल्याने गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे साधारण अनेक नागरिक संकटात सापडले होते.परंतु स्थानिक पोलीस प्रशासनाने सतर्कता दाखवून मदत कार्य सुरू केले.परंतु पावासाने गावाच्या जवळ असणाऱ्या ओढ्यावरील नवीन बांधकाम असणारा पूल वाहून गेल्याने मदत कार्यात अडथळा निर्माण झाला. तरीही मदत पथकाने जीवाची पर्वा न करता दोरी व लोखंडी शिडीच्या साहायाने सहा महिन्याच्या लहान मुली सह सर्व नागरिकांचे प्राण वाचवले. या मोहिमेला ‘ “ऑपरेशन विधी” असे नाव देण्यात आले होते.
ही मोहीम उलटून ही येथील सामान्य कुटुंबाना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पूर बाधित सर्व कुटुंबे ही मंगल कार्यालयात व जिल्हा परिषद शाळेत निवारा घेत आहेत.आपली गुरेढोरे ही मूळ गावी अडकली आहेत.सदर ठिकाणी आज पर्यंत कोणतेही प्रशासकीय अधिकारी आले नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पूर बाधित गावांना लवकरात लवकर पुनर्वसन करावे लागणार आहे या साठी सरकारने जागा देऊन घरे बांधून सर्व सोयीसुविधा द्याव्यात. येत्या सात दिवसात जर प्रशासनाने आणि राज्य सरकारने योग्य ती दाखल घेवुन न्याय दिला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही त्या अर्धवट वाहून गेलेल्या पुलावरून वाहत्या पाण्यात उड्या टाकून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आंदोलन करण्याचा इशारा तालुका अध्यक्ष आणि यात काहीही वाईट घडले तर याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा देण्यात आला आहे..
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाटण तालुका उपाध्यक्ष अंकुश कापसे, ढेबेवाडी विभाग अध्यक्ष दिपक मुळगावकर,दिपक रेटरे,महाराष्ट्र सैनिक,प्रकाश करपे,जगन्नाथ आबुळकर,सत्यवान गायकवाड, विनायक जाधव,शुभम पाटील,संकेत निवडुंगे,सुरेश सावंत सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply