ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

October 21, 202115:14 PM 81 0 0

 जालना : येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता आद्यकवी रामायण रचनाकार महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले.. यावेळी बोलताना भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते डॉक्टर नारायणराव मुंढे म्हणाले की वाटमारी करणाऱ्या वाल्याचा नारद महर्षींच्या उपदेशाने महर्षी वाल्मिक ऋषी झाला.शिक्षित, सुशिक्षीत, शिक्षक वर्गाने याप्रमाणे विद्यार्थी घडवण्याचे पवित्र कार्य केले पाहिजे तरच समाजाची व देशाची प्रगती होईल असा उपस्थितांना उपदेश केला.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुनंदा तिडके बोलताना म्हणाल्या की वाल्मिकी रचित रामायणातील चारित्र्या प्रमाने व्यक्ती- व्यक्ती मध्ये कुटुंबामधे प्रेम, बंधुभाव, मानवता ,नैतिकता असणे आवश्यक आहे .यावेळी बोलताना प्रा. डॉ. ज्योती धर्माधिकारी म्हणाल्या की कोणतीही व्यक्ती जन्मताच श्रेष्ठ नसते किंवा कनिष्ठ नसते तिच्या कार्यावरून तिचे श्रेष्ठत्व सिद्ध होत असते वाल्मिकी चारित्र्य हे समाजासाठी आदर्श उदाहरण आहे. श्री संतोष साबळे आपल्या अभिवादन पर भाषणात म्हणाले की महर्षी वाल्मिकी यांचे जीवन समाजासाठी अतिशय महान आदर्श असून वाल्मीक ऋषी ने तपश्चर्या करून आपले जीवन सार्थक बनवले म्हणून त्यांच्या हातून पवित्र रामायण लिखाणाचे कार्य घडले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लहूराव दरगुडे यांनी केले.. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.. ….   प्रसिद्धी प्रमुख.. श्री संतोष दादाराव साबळे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *