ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महात्मा जोतिबा फुले कृतिशील सुधारक होते – डॉ विजयकुमार कुमठेकर

April 11, 202216:02 PM 39 0 0

जालना :  महात्मा फुले यांनी समाज उद्धारासाठी शिक्षण सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे काम निःस्वार्थवृत्तीने केले. ते कृतियुक्त सुधारक होते असे प्रतिपादन प्रा डॉ विजयकुमार कुमठेकर यांनी केले. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंती कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना ते असे म्हणाले की महात्मा फुले हे कष्टकऱ्यांच्या हितासाठी लढणारे होते. ते शेतकऱ्यांचे पहिले नेते होते, शेतकऱ्यांचे कैवारी होते. तसेच शेतकऱ्यांना सावकाराच्या जाचातून मुक्त करण्याचे काम त्यांनी केले. एवढेच नव्हे तर त्यागाच्या बळावर फुलेनी वेगळी ओळख निर्माण केलेली दिसून येते. दिवसेंदिवस समाज भावनाहीन बनत चालला आहे. त्यामुळे समाजाला अजूनही महापुरुष समजले नाहीत.त्यासाठी विद्यार्थांनी शिक्षणाचा आधार घेऊन समाज सुधारकांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ संजय पाटील असे म्हणाले की, समाजामध्ये जे क्रांतिकारी बदल झाले ते महात्मा फुले यांच्यामुळेच झाले. त्यांनी शिक्षणाबरोबर शेतकऱ्यांनादेखील महत्व दिले. समाज सुधारकांनी केलेले काम फक्त ऐकण्यापेक्षा आचरण करणे किती गरजेचे आहे हे सांगितले. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. उपप्राचार्य प्रा रमेश भुतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी, रा से यो चे कार्यक्रमाधिकारी डॉ सिमा निकाळजे, डॉ मसूद अन्सारी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अविनाश भालेराव तर आभार डॉ सुरेंद्र पडगलवार यांनी व्यक्त केले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *