ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्या; मुरुड जंजिरा अध्यक्ष अजित गुरव व उपाध्यक्षपदी अनघा चौलकर यांची बिनविरोध निवड

December 14, 202120:48 PM 50 0 0

मुरुड जंजिरा (प्रतिनिधी,सौ नैनिता कर्णिक) : महात्मा फुले नागरी पतसंस्था मर्या;मुरुड जंजिरा ही पतसंस्था सन १९९१ मध्ये स्थापन करण्यात आली. बिनविरोध निवड प्रक्रियेची परंपरा कायम ठेऊन या वर्षीही पंचवार्षिक सचालक मंडळाची निवडणूक उत्साहात संपन्न झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अधिक्षक वाघमारे यांनी आपले काम उत्तम केले . अध्यक्षपदी अजित जगन्नाथ गुरव तर उपाध्यक्षपदी अनघा चौलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संचालकपदी कार्यकरणी सदस्य म्हणून आदेश दाडेकर,संदेश दांडेकर, सायली गुंजाळ,अमित कवळे,राहुल वर्तक,महेंद्र पाटील, उमेश अपराध ,संदेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पतसंस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे १२ कोटी ठेव असलेली नामांकित अग्रगण्य पतसंस्था आहे. या सर्व संचालक मंडळाचा पुष्प गुच्छ देऊनी सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोहरजी गुरव,माजी अध्यक्ष चंद्रकांत अपराध व्यवस्थापक जयंत शेडगे, उल्हास गुंजाळ , माजी नगराध्यक्ष मंगेशभाई दांडेकर ,सो.क्ष.माळी समाज माजी अध्यक्ष तथा नगरसेवक मनोजजी भगत,नगरपरिषद नगरसेवक अविनाश दांडेकर ,सेवानिवृत्त वरीष्ठ विस्तार अधिकारी सुनील जंजिरकर माळी समाज अध्यक्ष तथा नगरसेवक प्रमोदजी भायदे,संस्थेचे माजी चेअरमन कविवर्य कोकण मराठी साहित्य परिषद दक्षिण रायगड व मुरुड जंजिरा रायगडचे अध्यक्ष संजयजी गुंजाळ,श्रीकांत गुरव अरूण(दादा) गुरव, अविनाश भगतइत्यादी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत निवडणूक कार्यक्रम संपन्न झाला.
नवनिर्वाचित अध्यक्ष अजित गुरव यांनी आपल्या भाषणात संस्थेची अधिकाधिक उन्नती होण्यासाठी आगामी काळात नविन वास्तू बांधण्यासाठी सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *