ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महात्मा

October 1, 202114:55 PM 28 0 1

ब्रीद वाक्य बापूंचे
अहिंसा परमो धर्म
धर्माच्या नावे युद्ध
आमचे असे कुकर्म

स्वच्छता प्रिय तया
आम्हा न कळे मर्म
मन आमचे गलिच्छ
तरीही न वाटे शरम

सत्याग्रह अनुग्रह
बापू नवनीत नरम
आम्ही हिंस्र लांडगे
पांघरतो व्याघ्र चर्म

स्वातंत्र्यास्तव तुरूंग
सोसला त्रास चरम
तुरूंग वारी चुकवतो
आम्ही करी कुकर्म

पीडा पराई जानी रे
कळले न कधी मर्म
स्वार्थासाठी सहज
बनतो आम्ही बेशर्म

– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyskusum.com

Categories: कविता, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *