ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महेंद्रशेठ घरत यांच्या दणक्याने शेलघर – गव्हाण जोड रस्ता

August 9, 202115:30 PM 14 0 0

उरण (संगिता पवार) न्हावा -शिवडी महामार्ग (सागरी सेतू )व सिडको मास हाऊसिंगचे काम.सेक्टर 16 उलवे नोड मध्ये अतिशय वेगाने प्रगती पथावर आहेत.त्यामुळे शेकडो आवाजड वाहने.पोकलेन, डम्पर्स,क्रेन.चालु राहिल्या मुले शेलघर -गव्हाण जोड रस्ता  अत्यंत नादुरुस्त झालेला असल्यामुळे.मोटारसायकल, चारचाकी वाहने यांची ये जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने. नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

गव्हाण -शेलघर येथील ग्रामस्थांनी या तक्रारी लढाऊ कामगार नेते श्री. महेंद्रशेठ घरत साहेब यांच्या कडे केल्याने. महेंद्रशेठ घरत यांनी तातडीने. सिडको, MMRDA, L&T कंम्पनीच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर बोलावुन. त्यांची कान ऊघडणी केली. येत्या चार दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास. न्हावा -शिवडी महामार्ग व सिडको च्या मासहाऊसिंग या दोन्ही प्रकल्पाचे काम बंद पाडण्यात येईल. असा सज्जड दम सर्व अधिकाऱ्यांना दिला. महेंद्रशेठ यांच्या कामाची पद्धत माहिती असल्यामुळे तीन ते चार दिवसांच्या आत रस्ता पूर्ण होईल या पद्धतीने युद्ध पातळीवर काम पूर्ण करण्यात आले. यामुळे गव्हाण -शेलघर पंचक्रोशीतील ये जा करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.आणि खऱ्या अर्थाने आपल्या नावाने आणि कामाने डॅशिंग असलेले कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे ग्रामस्थानी आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *