ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आरोग्य शेत्रात रोटरी क्लब ऑफ जालना मिड टाऊन चे मोठे कार्य – एडवोकेट संजय देशपांडे

November 29, 202115:47 PM 66 0 0

जालना जिल्हा येथील न्यायालय कर्मचारी व विधिज्ञ तसेच ग्राहक आयोग येथील कर्मचारी यांच्यासाठी हाडाच्या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री संजय देशपांडे यांनी आरोग्य क्षेत्रात रोटरी क्लब चे मोठे कार्य असल्याचे प्रतिपादन केले.  जालना क्रिटिकल हॉस्पिटल चे डॉक्टर योगेश भडक यांनी माहिती दिली की हाडांच्या ठिसूळपणावर म्हणजेच ऑस्टियोपोरोसिस या व्याधीमध्ये अलीकडे विशिष्ट संप्रेरकांचे (हार्मोन्स) उपचार गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. व्याधीच्या तीव्र अवस्थेत हार्मोन्सच्या इंजेक्शनसमुळे ८० टक्क्यांपेक्षा जस्त रुग्णांना आराम पडत असल्याचा अनुभवदेखील तज्ज्ञांनी स्पष्ट केला आहे. अर्थात, ठिसूळपणाची समस्या मुळात उद्भवू नये, यासाठी निरोगी जीवनशैली व नियमित व्यायामाला पर्याय नाही, हेही नुकत्याच झालेल्या जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिनानिमित्त स्पष्ट करण्यात आले आहे.

‘मासिक पाळी बंद झाल्यानंतर किंवा वयोमानानुसार हाडांचा ठिसूळपणा ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. ‘हाडांमध्ये कॅल्शियम शोषले जाणे व त्याच वेळी काही प्रमाणात ते निघून जाणे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र वयोमानानुसार हाडांमध्ये कॅल्शियम शोषले जाण्याचे प्रमाण कमी होतानाच ते हाडांमधून निघून जाण्याचे प्रमाण वाढते. तेव्हाच ऑस्टियोपोरोसिसच्या व्याधीला सुरुवात होते. याच व्याधीमुळे मणक्यांचे किंवा इतर फ्रेंक्चरचे प्रमाणही वाढते. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ९० टक्के महिलांमध्ये, तर ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ६० टक्के पुरुषांमध्ये ऑस्टियोपोरोसिस आढळून येत आहेत.
पाठदुखी, कंबर दुखी, हाडांचे फॅक्चर ही ऑस्टियोपोरोसिसची लक्षणे आहेत. स्टेरॉइड्सचे अतिसेवन, धुम्रपान, मद्यपान, कॅल्शियम व इतर खनिजांची कमतरता, हीदेखील ऑस्टियोपोरोसिसची कारणे असू शकतात.
हाडांची घनता मोजून (टी-स्कोअर) ऑस्टियोपोरोसिस आहे किंवा नाही, हे ठरवले जाते. यात टी-स्कोअर हा उणे २.५ पेक्षा कमी असेल, तर ही व्याधी स्पष्ट होते आणि त्यानंतर सर्वांत आधी कॅल्शियम व व्हिटॅमिन ‘डी’ची औषधे सुरू केली जातात.
रोटरी क्लब ऑफ जालना मिड टाउन चे अध्यक्ष एडवोकेट महेश धन्नावत यांनी प्रतिपादन केले की त्यामुळेच व्यापक जनजागरणाच्या दृष्टिकोनातून स्थूलता तपासणी शिबिर रोटरी क्लब ऑफ जालना मिड टाउन तर्फे आयोजित करण्यात येत आहे. यापूर्वी सुद्धा पोलीस प्रशिक्षणार्थी वकील संघ साठी असे शिबिर ठेवण्यात आले होते.
शिबिरात न्यायाधीश , वकील, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते , आभार प्रदर्शन प्रशांत बागडी यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *