ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ई- श्रम व आयुष्यमान चे लाभ मिळवून देण्यास व्यापक प्रयत्न करा: भास्करराव पाटील दानवे सेवा सप्ताहाचा विविध उपक्रमांनी समारोप

September 25, 202113:25 PM 19 0 0

जालना ( प्रतिनिधी) : कामगार ,श्रमिक गोरगरीब व सर्वसामान्यांना आरोग्य सुविधांसह विम्याचे कवच देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई- श्रम व आयुष्य मान भारत या महत्वकांक्षी योजनांतून सुरक्षितता बहाल केली असून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यापक प्रयत्न करावेत .असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे यांनी आज येथे बोलतांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा द. भा. आघाडी सेलचे शहराध्यक्ष गणेश जल्लेवार यांच्या वतीने आयोजित सेवा सप्ताहाचा समारोप शुक्रवारी ( ता. 24 ) झाला. यानिमित्त आयोजित कार्ड वाटप सोहळ्यात भास्करराव दानवे बोलत होते. भाजपाचे शहराध्यक्ष राजेश राऊत , जेष्ठ नेते रामेश्वर पाटील भांदरगे, सिद्धिविनायक मुळे, माजी नगरसेविका सखुबाई पनबिसरे, प्रा. राजेंद्र भोसले, राजू बिकानेर, गणेश जल्लेवार, तुषार जल्लेवार यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.


भास्कर पाटील दानवे पुढे म्हणाले, सामाजिक दायित्व तून गणेश जल्लेवार हे नेहमीच गरजवंतांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन सेवा कार्य करत आहेत. त्यांचे उपक्रम सर्वसामान्यांना दिलासा देणारे असून पक्ष जल्लेवार यांच्या पाठीशी उभा राहिल. असे भास्करराव पाटील दानवे यांनी नमूद केले. राजेश राऊत म्हणाले, गांधी नगर, बालाजी गल्ली, या परिसरात गणेश जल्लेवार यांनी संकटकाळात स्वखर्चाने पाणी, धान्य वाटप, परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी, पर्यावरण पूरक गणेशोत्सव, वृक्ष संवर्धन अशा लोकोपयोगी उपक्रमांचे आपण साक्षीदार असून त्यांच्या कार्याचा पक्षास फायदा होईल. असा विश्वास राजेश राऊत यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात गणेश जल्लेवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहांतर्गत संपूर्ण परिसरात पाचशे वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्यांचे जतन केले जात आहे. डेंगु, मलेरिया साथरोगांपासून बचावासाठी परिसरात फवारणी, जेष्ठ नागरिक व बालकांना बसण्यासाठी सुविधा,उपलब्ध करून दिल्या असून सर्वसामान्यांसाठी लाभदायी असलेल्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी नोंदणी करण्यास प्रारंभ केला असल्याचे गणेश जल्लेवार यांनी स्पष्ट केले. सुञसंचालन शालोमन घोरपडे यांनी केले तर तुषार जल्लेवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास बालकिशन गुल्लापेल्ली, विनोद गड्डम ,किशन चिंतल, रवी अलगोंडा ,जेकब निर्मल, राजकुमार जल्लेवार, रवी आठवले, सार्थक जल्लेवार ,उत्तमराव पटूलवार, सुभाष रायपुरे, अजय जाफ्राबादी, लतीफ तांबोळी, शेख हबीब ,राजेंद्र श्रीराम यांच्यासह महिला व नागरिकांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *