ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

फलटण महावितरणाचा कारभार विडणीतील शेतकऱ्याला 84480/- रूपयाचा झटका

May 21, 202215:19 PM 43 0 0

फलटण प्रतिनिधी ( पूजा निकाळजे): विडणी फलटण येथील किसन शिवराम पवार यांनी दिनांक 17/7/2016 मध्ये त्यांच्या विहिरी वरील मोटारीसाठी नवीन विद्युत कनेक्शन साठी महावितरण कार्यालय फलटण येथे रुपये 7750 चे डिपाजिट भरले होते., परंतु आज तागायत त्यांच्या विहिरीवर नवीन विद्युत कनेक्शन मिळाले नव्हते. त्यांनी वारंवार महावितरणाच्या कार्यालयात जाऊन देखील त्यांचे विद्युत कनेक्शन जोडले गेले नाही.
दि. 19 मे 2022 नेहमी प्रमाणे महावितरण कार्यालय फलटण गेले असता त्यांना तेथील अधिकार्यांनी तुमचे थकीत बिल भरा असे सांगुन 84480/-रुपये रकमेचे बिल भरण्यासाठी बिल सादर केले व थकित बिल भरल्यानंतर तुमचे कनेक्शन जोडण्यात येईल असा आदेश दिला.
संबंधित शेतकऱ्याने पत्रकारांशी संवाद साधताना माझी मोठी फसवणूक करण्यात आली आहे. 2017 ते 2022 पर्यंत मला विद्युत कनेक्शन न मिळाल्यामुळे माझे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले तर आहेच,मला माझे नुकसान भरपाई मिळेल ही आशा मी धरत नाही, परंतु ज्या विहिरीत मोटारीसाठी नवीन विद्युत कनेक्शन जोडणे चा अर्ज केला होता, ते कनेक्शन तर मला मिळालेच नाही परंतु भरमसाठ बिल माझ्या समोर आले याचे मला आश्चर्य वाटत आहे.
अशाप्रकारे विद्युत महामंडळ शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. या प्रकरणाकडे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष घालून या विडणी गावातील शेतकऱ्याला योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी चर्चा सध्या तालुक्यात चालू आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *