ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मानदेऊळगाव ग्रामपंचायतीवर तथागत पॅनलचे वर्चस्व; ना. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

January 22, 202120:19 PM 51 0 0

जालना ( प्रतिनिधी) : जिल्ह्यात अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेची असलेल्या बदनापूर तालुक्यातील मानदेऊळगाव ग्रामपंचायतीवर तथागत पॅनलने वर्चस्व निर्माण केले असून एकूण नऊपैकी सात जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांचा केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते शुक्रवारी ( ता. 22) जालन्यात सत्कार करण्यात आला.

अंबड चौफुली जवळील शासकीय विश्राम गृहात पॅनल प्रमुख विलासराव डोळसे यांच्यासह नवनिर्वाचित सदस्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेतली. या वेळी आ. नारायण कुचे उपस्थित होते.नवनिर्वाचित सदस्यांचा ना. दानवे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या .
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मानदेऊळगाव येथील रमाबाई जगन्नाथ डोळसे, शशिकला भीमराव गायकवाड, राहुल कांताराम डोळसे, मीना देविदास डोंगरे, मंगल संतोष कदम ,अरुण विनायक माने, दीपक भीमराव एकनार हे विजयी झाले आहेत. त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी रतनराव डोळसे, जगनराव डोळसे, शालिक डोळसे, गणेश कदम, शिवाजी पवार ,राजू गायकवाड, गणेश डोळसे, मुरारी जमदाडे, विश्वनाथ गायकवाड ,भागाजी भाडळकर ,मनोहर भाडळकर, शिवाजी कातुरे ,ऋषी शेळके, शरद डोळसे, सुनील डोळसे ,संजय डोळसे, निवृत्ती डोळसे ,मिलिंद दाभाडे ,पुंडलिक वाहुळे ,नारायण डोळसे, साहेबराव डोळसे, विकास डोळसे, अमित डोळसे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *