ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मराठा व बौद्धांनी वैचारिक परिवर्तनाची लढाई एकत्रित लढावी

February 22, 202115:57 PM 150 0 0

नांदेड – बौद्ध आणि मराठा समाजात अनेक बाबींत साम्य आढळते. काही भिन्न किरकोळ मुद्द्यांवरून दोन्ही समाजात तेढ निर्माण केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र, जीवनकार्य डोळसपणे अभ्यासून समजून घेतल्याने माणसाची केवळ प्रगतीच नाही तर उत्कर्षही होतो. समाजापुढे अनेक प्रश्न आहेत, जीवन संघर्षही अविरत चालू आहे. मराठा व बौद्ध समाजाने वैचारिक परिवर्तनाची लढाई एकत्रितरित्या लढावी, अशी हाक मराठा सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस रमेश पवार यांनी शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपाचे माजी उपायुक्त प्रकाश येवले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण उपसभापती ज्योत्स्नाताई गोडबोले, रमेशभाऊ गोडबोले, साहित्यिक गंगाधर ढवळे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, गयाताई कोकरे, मिलिंद शिराढोणकर, संजय वाघमारे, अॅड. नितीन थोरात‌ आदींची उपस्थिती होती.

नांदेड शहरातील देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी रमेश पवार बोलत होते. पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही घटनांचा भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी असलेला संबंध विविध उदाहरणांनी उलगडून दाखवला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश मा येवले, रमेश गोडबोले, संतोष आंबुलगेकर, गयाताई कोकरे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामुदायिक त्रीसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.‌ त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रज्ञा करुणा विहार समिती मार्फत मिल्स कामगारांच्या वस्तीतून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाल्याबद्दल अशोक हटकर व मीराताई खाडे यांचा प्रकाश येवले, रमेश गोडबोले, रमेश पवार आणि सुभाष लोखंडे तसेच सविता नांदेडकर, ज्योत्स्ना गोडबोले आणि शिल्पाताई लोखंडे यांच्या शुभहस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमुर्ती मिराताई खाडे आणि अशोक हाटकर यांनी सत्काराला उत्तर दिले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संयोजक सुभाष लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय हिंगोले, धनराज खाडे,शांता सावंत, शारदा खाडे, रमा खाडे, गोदावरी राजभोज, नारायण सावंत, रघुनाथ कांबळे, निर्मला पंडित, शोभा गोडबोले, शिल्पा लोखंडे, चौतरा चिंतूरे, सुमन वाघमारे, सविता नांदेडकर, सुशीला हटकर, निला हटकर, आशा हटकर, जिजाबाई खाडे, प्रभावती हटकर, रमाबाई सातोरे, संघपाल गोडबोले, गौतम येवले, अनिकेत नवघडे, राजू हटकर, जळबाजी थोरात, बाबुराव गोडबोले, रमेश सातोरे, रवी गोडबोले, गोविंद हटकर, अंकिता गोडबोले, गिता दिपके, श्यामा नरवाडे, अॅड. प्रवीण खिल्लारे, विनोद खाडे, उमेश दिपके, दीपक हटकर, सिद्धार्थ पंडित, रवी कोकरे, सुरेश सावळे, सुनीता मुंगे, शकुंतला सावते, जिजाबाई झिंझाडे, पद्मिनी धुळे आदींनी परिश्रम घेतले. बुद्ध विहारात झालेल्या शिवजयंतीच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *