ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

परतुर न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा उत्साहात

January 28, 202113:20 PM 19 0 0

जालना/प्रतिनिधी परतुर तालुका विधी सेवा समिती व वकील संघ परतुर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय क. स्तर परतुर येि मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त कायदेविषयक शिबीर घेण्यात आले. विधीज्ञ जे.पी. बागल यांनी कज्ञार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दिनेश मिसाळ यांनी मराठी भाषेबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

विधिज्ञ एम.पी. वेढेकर यांनी राष्ट्रीय मतदार दिन या विषयांवर मार्गदर्शन केले. विधीज्ञ किनगांवकर यांनीही मार्गदर्शन केले. तसेच बालिका दिन या विषयावर एस.जी. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती पी.एन. कोकाटे दिवाणी न्यायाधिश क. स्तर परतुर या होत्या. मराठी भाषेचा न्यायालयीन कामकाजामध्ये जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. सुत्रसंचलन विधीज्ञ वसिम जमीनदार यांनी केले. आभार एन.एन. आढे यांनी मानले. यावेळी विधीज्ञ एन.एम. म्हस्के,कर्मचारी भावसार यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *