उरण (संगिता पवार) योगा विथ पूनम ग्रुप उरण तर्फे द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी डाउरनगर येथे मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाले. यावेळी 14 वर्षे खालील वयोगट मध्ये प्रथम महेश मुंजे, द्वितीय अरबाज खान, तृतीय अभय वर्मा मुलींमध्ये प्रथम स्नेहा जाधव, द्वितीय साक्षी जाधव, तृतीय तनिष्का बोरसे,12 वर्षे वयोगट खालील गटात प्रथम सार्थक गिरी, द्वितीय अथर्व डॉलटे, तृतीय सार्थक लवटे तर मुलींमध्ये प्रथम प्रज्ञा मुंजे, द्वितीय हर्षदा माने, तृतीय संचिता गोरे तर लहान गट (9वर्षा खालील )प्रथम दर्शन राठोड, द्वितीय जयेश कातकरी, तृतीय शौर्य चव्हाण व मुलींमध्ये प्रथम पूनम बुरुंगळे, द्वितीय नम्रता चव्हाण, तृतीय श्रुष्टी मनमाने आणि 5 वर्षा खालील गटात प्रथम क्रमांक स्वप्निल वनमाने, द्वितीय स्वरा वाघडे, तृतीय इंद्रणिल येडके यांनी क्रमांक पटकावीला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पूनम चव्हाण यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शिक्षिका बी एम बिंदू, अभिनव कांबळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फुलचंद पाटील, माळाप्पा बुरुगळे, काशिनाथ पाटील, रमण चव्हाण, प्रकाश चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी राज्यस्तरीय खेळाडू व्ही एम श्रीलक्ष्मी, विवेक यादव, राजन पांडे यांचा सत्कार करण्यात आला. देवकी चव्हाण यांनी त्यांचा सत्कार केला. शेवटी सर्वांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Leave a Reply