ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विवाहितेवर सामूहिक बलात्कार

April 27, 202113:15 PM 86 0 0

लखनौ : महिलांविरोधातील गुन्हे कमी करण्याबाबत उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि यूपी पोलिस दावे करत असूनही अशा घटना कमी होताना दिसत नाहीत. आग्य्रात विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न सोहळ्यात जेवण बनवणाऱ्या मदतनीस महिलेवर कॅटररसह पाच जणांनी गँगरेप केल्याचा आरोप आहे.

कामाच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले

लग्न सोहळ्यानंतर आणखी काम मिळवून देण्याच्या आमिषाने कॅटरर आणि एका व्यक्तीने पीडित महिलेला निर्जन स्थळी नेले. तिथे तिघे जण आधीच उपस्थित होते. त्यानंतर पाच जणांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. रविवारी रात्री उशिरा हा प्रकार घडल्यानंतर तिला गंभीर अवस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पसार झाले.

लग्न सोहळ्यात कॅटरिंगमध्ये मदतनीस

शुद्ध आल्यानंतर पीडितेने पोलिसात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. पीडित महिला छोटेखानी समारंभांमध्ये जेवण बनवण्यासाठी मदतनीस म्हणून काम करते. आग्र्यातील संबंधित लग्न सोहळ्यात पुरी तळण्याच्या कामासाठी ती गेली होती.

बरहन पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या पतीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन महिलेची वैद्यकीय चाचणी केली. तिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे. आग्रा ग्रामीण पोलीस अधीक्षक सत्यजीत गुप्ता या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

35 वर्षीय महिलेवर 11 जणांचा गँगरेप

झारखंड जिल्ह्यात अवघ्या काही दिवसांपूर्वीच वासनांधता आणि क्रूरतेचा अक्षरशः कळस पाहायला मिळाला होता. 35 वर्षीय महिलेवर तब्बल 11 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. गँगरेप करणारे आठ आरोपी कोरोनाग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. तर बलात्कार पीडितेलाही कोरोना संसर्ग झाल्याची माहिती आहे.

शस्त्राच्या धाकाने महिलेचं अपहरण

पीडित महिला संध्याकाळच्या वेळेस शौच करण्यासाठी चालली होती. यावेळी वाटेत काही युवक मद्यपान करत बसले होते. महिला एकटीच असल्याचं पाहून त्यांनी शस्त्राच्या धाकाने तिचं अपहरण केलं. काही अंतरावर झाडीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आपल्या आणखी काही नातेवाईकांनाही बोलावून घेतलं. अकरा जणांनी अख्खी रात्र महिलेवर अत्याचार केले.

Categories: राष्ट्रीय
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *