ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

केईएम रुग्णालयात भव्य रक्तदान शिबीर संपन्न

December 4, 202113:57 PM 48 0 0

रक्त आपल्या शरीराकरता किती उपयोगी आहे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे मनुष्याला अनेक आजारांना सामोरं जाव लागतं, कित्येकवेळा तर मनुष्याचा मृत्यु देखील ओढवतो. एखाद्या अपघातात मनुष्य जख्मी झाल्यास किंवा गंभीर आजार झाल्यास माणसाच्या शरीरात रक्ताची कमतरता मोठया प्रमाणात निर्माण होते. ही कमतरता भरून काढण्याकरता मनुष्याला आवश्यक त्या रक्तगटाची गरज भासते, अश्या वेळी एका व्यक्तीच्या शरीरातुन रक्त काढुन दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात देण्याने ही कमतरता कमी होऊ शकते. रक्त केवळ मनुष्याच्या शरीरातच तयार होते याला कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. आपण देखील रक्तदान करून एखाद्या गरजवंताची निकड पुर्ण करण्याकरीता पुढे यावं असे आवाहन के इ एम हॉस्पिटलचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण बांगर यांनी केले. ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने वडाळा येथील तारामाता चॅरिटेबल ट्रस्टच्या सुजाता मनोहर वाडकर यांनी के इ एम हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे (ता.३ डिसेंबर) रुग्णालय रक्तपेढी विभागात आयोजन केले होते.

रुग्णालय उप अधिष्ठाता डॉ मिलिंद नाडकर, नगरसेवक सचिन पडवळ, असिस्टंट डीन डॉ मनोज तालकटवार, फार्मसी एच ओ डी प्रकाश महाला, फार्मसी शितल चंदन, रक्तदाता चळवळीचे कार्यकर्ते ज्ञानोबा दाभेकर, बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे अनील निरभवणे, डॉ सायली वाघमोडे, डॉ शिबानी पठाडे, सामाजिक कार्यकर्ते वैभव जुहेकर, सिनियर MSW किशोर जाधव, गुजराती समाजाचे अध्यक्ष रमेश सोसा उपस्थित होत्या.
के ई एम स्टाफ आणि के इ एम रुग्णालय युवा ग्रुपने हे शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *