ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी जालन्यात भव्य रक्तदान शिबीर

December 18, 202113:22 PM 63 0 0

जालना (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 65 व्या पुण्यतिथीनिमित्त डेबुजी व गुरूशिष्य परिवाराच्या वतीने दि. 20 डिसेंबर रविवार रोजी जालना शहरात भव्य रक्तदान शिबीर व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुना जालना भागातील गणपती गल्ली परिसरात असलेल्या महालक्ष्मी मंदीरात रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर, कोव्हिड लसीकरण शिबीर, आरोग्य शिबीर, संत गाडगेबाबा पुरस्कार, गुरूशिष्य पुरस्कार इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डेबुजी व गुरूशिष्य परिवाराच्या वतीने गेल्या काही वर्षापासून रक्तदान शिबीर व इतर उपक्रम राबविण्यात येतात. करोनाच्या पार्श्‍वभुमीवर निर्माण झालेला रक्ताचा तुडवडा आणि रक्त तुडवड्यामुळे रूग्णांसह नातेवाईकांची होत असलेली हेळसांड लक्षात घेवून डेबुजी व गुरूशिष्य परिवाराच्या वतीने याही वर्षी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरासाठी तब्बल 175 रक्तदात्यांनी नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डेबुजी परिवारातील सदस्य गणेश इंगळे, किशोर खंडाळे, काशिनाथ मेव्हणकर, रोषण इंगळे, हितेंद्र आगळे, दुर्गेश मोरे, रमेश पैठणकर, नकुल राऊत, मनिष जाधव, सचिन शिंदे, प्रतिक आगळे, राहुल वाघमारे तसेच गुरूशिष्य परिवाराचे सदस्य प्रताप उजेड, योगेश बनसोडे, श्रीहरी उजेड, बाबासाहेब ओळेकर, योगेश मोरे, जालिंदर लाड, रवी तारो, शौकत सय्यद, राम चव्हाण, अरूण सुरसे, गजानन उजेड आदी सदस्य परिश्रम घेत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *