ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून धम्मप्रसाराचे भरीव कार्य – डॉ. खेमधम्मो

January 23, 202213:54 PM 52 0 0

नांदेड – भारतातील भिक्खूंचे संघटन करुन धम्मचळवळ गतिमान करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. भदंत पंय्याबोधी थेरो यांनी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून धम्मप्रसाराचे भरीव कार्य सुरू केले आहे ते अत्यंत उल्लेखनीय आहे, प्रशिक्षण केंद्राच्या अधिकाधिक विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन मुळावा येथील भदंत प्राचार्य डॉ. भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात पौष पौर्णिमेनिमित्त दहा दिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. भदंत खेमधम्मो महास्थविर(मुळावा) यांच्यासह भदंत डॉ. एस. काश्यपायन महास्थविर(कोल्हापूर), भदंत महाविरो स्थविर ( अहमदपूर), भदंत पंय्याबोधी थेरो, भदंत पंय्यानंद ( लातूर), भंते रेवतबोधी ( देगलूर), भंते संघप्रिय ( सिडको), भंते संघरत्न, भंते चंद्रमणी, भंते धम्मकिर्ती, भंते श्रद्धानंद, भंते सुनंद, भंते शिलभद्र, भंते सुयश, भंते शाक्यपुत्र तसेच मुळावा येथील श्रामणेर भिक्खू संघ यांची उपस्थिती होती.

ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा परिसरात पौष पौर्णिमेचे औचित्य साधून ‘पौर्णिमोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मेजर डॉ. प्रदिप गायकवाड, डॉ. सरिता गायकवाड, इंजि. भारतकुमार कानिंदे, अशोक गोडबोले, डॉ. विलास ढवळे, मिलिंद व्यवहारे, दिलीप पोहरे, भैय्यासाहेब गोडबोले, प्रज्ञाधर ढवळे, निवृत्ती लोणे, राजू वाठोरे, ईश्वर सावंत यांची विशेष उपस्थिती होती. शहरातील उपसरपंच नगर येथील महिला मंडळाच्या वतीने भिक्खू संघाला आणि उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना भोजनदान देण्यात आले. त्यानंतर मान्यवर भिक्षूंच्या उपस्थितीत बोधीपुजा संपन्न झाली. संघावर पुष्पवृष्टी करीत धम्ममंचावर पाचारण करण्यात आले.‌ तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप आणि पुष्पपूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर धम्मदेसनेला प्रारंभ झाला. त्यात भदंत महाविरो स्थविर आणि भदंत डॉ. एस. काश्यपायन स्थविर यांची धम्मदेसना संपन्न झाली. प्रास्ताविक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. सूत्रसंचालन भंते श्रद्धानंद, धम्मसेवक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले तर आभार निवृत्ती लोणे यांनी मानले.
दरम्यान, आॅल इंडिया भिक्खू संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी भदंत पंय्याबोधी थेरो यांची निवड झाल्याबद्दल उपप्राचार्य साहेबराव इंगोले आणि सिद्धांत इंगोले यांनी पुष्पगुच्छ देऊन मंगल कामना व्यक्त केल्या. शेवटच्या सत्रात सुभाष लोकडे सुगावकर, माया खिल्लारे, वंदना खिल्लारे आणि मिनाक्षी वाघोळे पिंपळगाव कोरका येथील संघाकडून प्रबोधन गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. शैलेश वायवळ, पृथ्वीराज असले, उमाजी नरवाडे, नागोराव नरवाडे, आप्पाराव नरवाडे, उमाजी नरवाडे, वामन नरवाडे, अनिता नरवाडे, सुरेखा नरवाडे, रवी नरवाडे, मधुकर नरवाडे, साहेबराव नरवाडे, कृष्णा नरवाडे, राजरत्न नरवाडे, अनिल नरवाडे, सूरज नरवाडे, संजय नरवाडे यांनी परिश्रम घेतले. श्रद्धा काॅलनी महिला मंडळ, आंबेडकर नगर महिला मंडळ, राज नगर, लिंबगाव, खुरगाव, नांदुसा, गायतोंड, मरळक, चिखली, भोगाव, जवळा पांचाळ आदी ठिकाणांहून बौद्ध उपासक उपासिकांची उपस्थिती होती.
मनाची एकाग्रता म्हणजे सम्यक समाधी
भिक्खू संघाने दिलेल्या धम्मदेसनेतून दिलेल्या धम्मसंदेशाचे सारतत्व असे होते की, कुशल कार्यात चित्ताची एकाग्रता होणे, म्हणजेच सम्यक – समाधी होय. कोणत्याही एका चांगल्या विषयावर चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ‘सम्यक समाधी’, स्वभावतःच मन चंचल असते. यास्तव त्याला एकाग्र – चित्त करणे म्हणजेच समाधी होय. जेवढे पुण्यधर्म आहेत ते सर्व समाधिकडे घेऊन जाणारे आहेत. अशा तऱ्हेने समाधी प्रमुख आहे. समाधीचा अभ्यास केल्याने व समाधी लागल्यानेच खरे ज्ञान होते. कर्म करतांना आपल्या मनातील हेतू शुध्द असला पाहिजे. चांगला असला पाहिजे. चांगल्या हेतूनेच, उद्देशानेच कर्म केले पाहिजे. वाईट हेतूने कर्म केले तर परिणाम वाईट होतोच हे लक्षात ठेवावे. म्हणूनच शुध्द मन, निर्मळ मन हेच अत्यंत महत्वाचे आहे. कुशल कर्माच्या आधारेच जीवन जगले पाहिजे. सम्यक कर्म हेच शीलाचे महत्वाचे अंग आहे. आपल्याला शीलवंत व्हायचे तर आपले कर्म व कर्मामागील हेतु शुध्द, निर्मळ, निस्वार्थ असला पाहिजे. पंचशीलाचे पालन करणे म्हणजेच सम्यक कर्म करणे होय. आपण सम्यक कर्मानुसार चांगल्या हेतुने जीवन जगण्याचा प्रयत्न केला नाही याचा अर्थ आपण चुकीच्या हेतुने कर्मे केली असा होतो. शीलाचे पालन केले नाही तर परिणाम चांगला होणार नाही. अशुध्द हेतूने केलेल्या कर्माचे फळ, चांगले असूच शकत नाही.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *