ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

धावत्या रिक्षात सहप्रवाशी महिलेकडे बघून हस्तमैथुन; आरोपीला अटक

April 7, 202113:09 PM 4 0 0

पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेकडे पाहून सहप्रवाशाने हस्तमैथून केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी ही घटना घडली. पीडित महिला आपल्या लहान मुलाला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात रिक्षातून घेऊन जात असताना हा प्रकार घडला. सोहेब इक्बाल कुरेशी असं अटक करण्यात आलेल्या ३० वर्षीय आरोपीचं नाव आहे.

पीडित महिला मोरवाडी येथून शेअरिंग रिक्षातून आपल्या लहान मुलाला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होती. त्यावेळी रिक्षात बसलेली व्यक्ती आपल्याकडे बघून अश्लील कृत्य करत असल्याचं महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर रिक्षा वायसीएम रुग्णालयाजवळ पोहोचताच महिला रिक्षातून उतरली आणि तिने आवारातच असलेल्या पोलिस चौकीत जाऊन घटनेची माहिती दिली, नंतर तातडीने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. ‘रिक्षातून उतरताच महिलेने तातडीने रुग्णालयाच्या आवारात असलेल्या पोलिस चौकीत धाव घेतली आणि पोलिसांना आरोपीबाबत सतर्क केलं. लगेच स्थानिकांच्या मदतीने आरोपी सोहेब इक्बाल कुरेशी याला अटक करण्यात आली’, अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *