ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवसेनेचे गटनेते व उरण नगरपषदेचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांना मातृशोक

September 4, 202112:57 PM 11 0 0

उरण (रायगड) तृप्ती भोईर : शिवसेना गटनेते व उरण नगरपषदेचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या मातोश्री मालतीबाई भास्कर शिंदे यांचे दिनांक १ सप्टेंबर बुधवार रोजी त्यांच्या रहात्या घरी म्हणजे गणेश नगर, करंजा रोड, उरण येथे वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.


स्वर्गीय मालतीबाई शिंदे हे एक दानशूर व्यक्तीमत्व, प्रेमळ स्वभाव, तसेच आई एकवीरेच्या निस्सीम भक्त होत्या. आजपर्यंत त्यांच्या घरी गेलेला याचक रिक्त हाताने कधीही मागे फिरला नाही. गोड स्वभाव आणि मानवतावादी व्यक्तीमत्व आज हरपले आहे.
त्यांचे मोठे चिरंजीव थोर समाजसेवक व प्रसिद्ध उद्योगपती राजेंद्र शिंदे, व छोटे चिरंजीव गणेश शिंदे ही दोन्ही भावंडे समाजसेवेसाठी नेहमीच योगदान देत असतात. त्यांच्या मातोश्रींच्या जाण्याने झालेले दुख पेलण्यासाठी त्यांना बळ मिळो.
स्वर्गीय मालतीबाई शिंदे यांच्या पश्चात त्यांची दोन मुले, सुना, दोन मुली ,जावयी व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्वर्गीय मालतीबाई शिंदे यांची अंत्ययात्रा गणेश नगर येथुन कोटगाव काळाधोंडा येथील स्मशानभूमीत काढण्यात आली . त्यांच्या अंत्ययात्रसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण शहर तालुका प्रमुख संतोष ठाकूर, सहसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, तालुका उपसंघटक के. एन घरत, माजी शहरप्रमुख महेंद्र पाटील, नगरसेवक समीर मुकरी चाणजे ग्रामपंचायत सरपंच मंगेश थळी, माजी ग्रामपंचायत सदस्य रवि पाटील, म.न से.नेते सुनील पाटील, भाजपचे नेते नित्यानंद भोईर, व रवि भोईर, कराडी समाजाचे सचिव विलास पाटील इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *