ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मातोश्री गु्रपच्यावतीने दहीहंडी उत्साहात अजानच्या वेळी कार्यक्रम थांबवून दिला एकतेचा संदेश

August 24, 202219:05 PM 10 0 0

जालना । प्रतिनिधी – श्रावण महिना सुरु आहे आणि एकामागोमाग सणांची या महिन्यात रांगच लागलेली असते. श्रावणात येणारा गोपाळकाळा अर्थात दहीहंडी गांधीनगर येथील मातोश्री ग्रुपच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी सायंकाळच्या अजानचा आवाज ऐकताच कार्यक्रम थांबविण्यात आला होता. अजानच्या वेळी गाण्यांचा आवाज बंद करून एकतेचा संदेश या ग्रुपच्यावतीने देण्यात आला. याबद्दल त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
या दहीहंडी उत्सवाचे उदघाटन काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी केले. यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक श्री नरोडे, माजी नगरसेवक आरेफ खान, माजी नगरसेवक जीवन सले, आशिष (सोनू) सामलेटी, अमजद खान, राष्ट्रवादीचे मनोज देवरे, माणिकराव मराठे, मातोश्री ग्रुपचे मनोज घडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा दहीहंडी उत्सव शहरभरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. गांधीनगरातही उत्साहाची धूम पहायला मिळाली. गोविंदा रे गोपाला, गोविंदा आला रे आला, मच गया शोर सारी नगरी मे, यासारख्या गाण्यांवर गोंविदा थिरकले. कार्यक्रमाच्या मध्यात अजानचा आवाज ऐकताच गाण्यांचा आवाज बंद करत कार्यक्रम थांबविण्यात आला. मातोश्री ग्रुपच्या या एकतेच्या संदेशाचे मुस्लीम बांधवांकडून कौतूक करण्यात येत आहे.

या कार्यक्रमासाठी राहुल फासाटे, गणेश बाभळे, पंकज घडे, प्रमोद देवकुळे, प्रदिप झिने, उमेश केंधळे, आकाश नगरे, आनंद जाधव, युवराज सले, सुदर्शन सरोदे, अशोक इंगळे, अजय घडे, राहुल वाडेकर, रोहित शिरपुरे, कृष्णा सलामपुरे, सागर काटे, सुमित काटे, प्रशांत मराठे, अविनाश इंगळे, शाम इंगळे, तुषार नगरे, मिथून नगरे, सचिन सलामपुरे, निलेश घडे, आकाश पवार, सागर पवार, करण काटे, सुमित बाभळे, ऋषिकेश इंगळे, कृष्णा बनसोडे, आकाश कणिसे, राम पवार, रमेश घडे, शुभम सले, गणेश दावत, विष्णू सिनगारे, छगन देवरे, लालचंद कणिसे, दिनेश कणिसे, राजु बाभळे, सतिश सले, विजय कणिसे, अर्जुन सले, जयेश क्षत्रिय, प्रेम घडे, भीम कणिसे, निलेश घडे, आकाश देवरे, शुभम बावरकर, देवा घडे, सोनू सांबरे, तेजस मुंडे, रवि बाभळे यांच्यासह मातोश्री गु्रपच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *