नांदेड – येथील सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्य उपाध्यक्ष नागोराव डोंगरे यांच्या मातोश्री भागाबाई विठ्ठलराव डोंगरे प्रतिष्ठान, उमरीच्या वतीने सन २०१९ व २०२० करिता विविध क्षेत्रातील मान्यवरांना अकरा पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात सुप्रसिद्ध कवयित्री संध्या रंगारी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर, फर्डे वक्ते प्रा. डॉ. रामकृष्ण बदने, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांच्यासह अकरा जणांची प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी निवड करण्यात आल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष गंगाधर ढवळे यांनी दिली. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, पदक, ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्काराचे हे नववे वर्ष असून त्यात कवयित्री छाया कांबळे, (नांदेड) यांना उत्कृष्ट कवयित्री हिरकणीरत्न पुरस्कार, प्रा. संध्याराणी रंगारी (आखाडा बाळापूर) उत्कृष्ट वाङमय पुरस्कार, प्रा.लक्ष्मी पुरणशेट्टीवार (धर्माबाद) कथारत्न पुरस्कार, कवयित्री सिंधुताई दहीफळे (हिंगोली) व श्रीमती चांगोणाबाई गोणारकर ( नांदेड) वात्सल्याची सावली पुरस्कार, विलास सिंदगीकर ( जळकोट) ग्रामीण कथारत्न पुरस्कार, अनुरत्न वाघमारे (नांदेड) व संतोष घसिंग (गेवराई, जि. बीड.) यांना काव्यरत्न पुरस्कार तर पत्रकार गंगाधर मिसाळे (धर्माबाद) आणि राजेश्वर कांबळे (कंधार) यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे तसेच प्रख्यात वक्ते माय’कार प्रा. डाॅ. रामकृष्ण बदने (मुखेड) यांना माऊलीरत्न पुरस्कार या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पुरस्कार वितरण करण्यात आले नव्हते. एका शानदार सोहळ्यात सदरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे संयोजन समितीने कळविले आहे.
Leave a Reply