खालापूर ( अदिती पवार ) – लोकसत्ता संघर्षच्या माध्यमातून बेस्ट नगराध्यक्ष महाराष्ट्राचा पुरस्कार 2021 ने कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांना सन्मानित करण्यात आले आहे. अहमदनगर यथे झालेल्या समारंभात जिल्हा परिषद अध्यक्ष सुजीत झावरे- पाटील यांच्या हस्ते पुरस्कार बेस्ट नगराध्यक्ष महाराष्ट्राचा पुरस्कार 2021 ने कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांना सन्मानित करण्यात आले आहे. याप्रसंगी मुख्य संपादक प्रकाश साळवे, संपादक सिद्धीनाथ मेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते, पुरस्कार रूपाने मिळालेल्या 51 हजार रुपयांचे रक्कम त्यांनी कोरोना मुळे ज्या मुलांचे आई-वडीलांचे दुर्दैवी निधन झाले अशा अनाथ मुलांसाठी वापरण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी समर्पित केली आहे. पुरस्कार स्वीकारल्या नंतर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी म्हणाल्या कर्जतकरांच्या आशिर्वादाने आणि सहकार्याने हा पुरस्कार मला अडीच वर्षाच्या कारकिर्दीसाठी मिळाला आहे आणि उर्वरित अडीच वर्षांसाठी हा सन्मान मला प्रेरणा देणारा ठरणार आहे असे सांगितले
Leave a Reply