ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

फरदीन खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीविरूध्द मकोका लावा :  सय्यद जमिल रजवी

January 11, 202212:47 PM 49 0 0

जालना (प्रतिनिधी) ः शहरातील उडपी चौक सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हाद्दीत फरदीन खान या युवकावर दि. 4 जानेवारी रोजी भरदिवसा नंग्या तलवारी घेवून गुन्हेगारी पार्श्‍वभुमी असलेल्या आरोपीतांनी प्राणघातक हल्ला केला असून सदरील आरोपीवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई न करता पोलीसांनी त्यांच्याविरूध्द भादवी कलम 307, 452, 143, 148, 149, 324, 323 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. वास्तविक पाहता या आरोपीतांवर मकोका नुसार कारवाई करावी यासाठी रजा अकॅडमीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सय्यद जमिल रजवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे गृहमंत्री यांना आज सोमवारी निवेदन देण्यात आले आहे.

या संदर्भात गृहमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, ही घटना घडल्यानंतर काही युवकांनी शहरातील बाजारपेठेमध्ये हुल्लडबाजी करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे संबंधीत पोलीसांनी युवकांवर गुन्हा नोंदवून अटक केली आहे. परंतू या प्रकरणात काही निष्पाप युवकांना गोवण्यात आले आहे. त्यांची चौकशी करून त्यांना या गुन्ह्यातून काढण्यात यावे व त्यांची सुटका करण्यात यावी. या घटनेमुळे शहरातील वातावरण दुषीत करण्याचा आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचा प्रयत्न विरेंद्र धोका आणि अन्य लोकांनी करत त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये या प्रकरणाच्या संदर्भाने मुस्लीम समाजाच्या विरूध्द प्रक्षोभक वक्तव्य करून सन 2002 चा गोधरा कांड करू अशी धमकी विरेंद्र धोका आणि अन्य लोकांनी जाहीररित्या दिली. त्यामुळे शहरातील वातावरण बिघडवण्याचे आणि सामाजिक सलोखा धोक्यात आणण्याचे गैरकृत्य या लोकांनी केलेले आहे. सदर बाजार पोलीसांनी या लोकांविरूध्द या प्रकरणी गुन्हा नोंदविलेला आहे. या लोकांची पार्श्‍वभुमी ही शहरातील शांतता भंग करणे, दंगल माजविणे अशी आहे. याची संपुर्ण चौकशी करून शहराच्या शांततेसाठी या सर्व लोकांविरूध्द कडक कारवाई करण्यात येवून त्यांना ताबडतोब हद्दपार करावे असेही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सय्यद जमिल अहेमद, मौलाना दिलावर हुसेन रजवी आणि सय्यद मोहसिन चिश्‍ती आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *