जालना :- करोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र कोविड-19 , उपाययोजना नियम 2020 वर मधील नियम 3 नुसार कोविड-19 वर नियत्रंण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 31 मार्च 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत उपाययोजना व निर्बध लागू करण्यात आले आहे.
जिल्हातील मंगल कार्यालय, फंक्श्न हॉल इत्यादी सर्व केवळ लग्न समारंभासाठीच सुरु राहतील. सदर कार्यक्रमात उपस्थितीची संख्या 20 पेक्षा जास्त नसावी. त्या ठिकाणी उपस्थितीत सर्वांनी कोविड-19 बाबतचे राष्ट्रीय मार्गदर्शन तत्वे सक्तीने पाळवीत व मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता, सोशल डिस्टंसींग इ. चे पालन करणे बंधनकारक राहील अन्यथा कार्यक्रमाचे आयोजक, संबंधीत मंगल कार्यालयाचे, हॉलचे व्यवस्थापक विरुध्द संबंधीत यंत्रणा नगर परिषद, नगर पंचायत, पोलीस प्रशासन इ विभागांनी योग्य ती दंडात्मक कार्यवाही करावी, जालना नगर परिषद हद्दीतील सर्व हॉटेल, खानावळ, चहाचे हॉटेल, बार, रेस्टॉरंट इ ग्राहकांसाठी पुर्णत बंद राहतील, तथापी केवळ पार्सल सुविधेसाठी सुरु राहतील. त्याठिकाणी सर्वांनी कोविड-19 बाबतचे राष्ट्रीय मार्गदर्शन तत्वे सक्तीने पाळवीत व मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता, सोशल डिस्टंसींग इ. चे पालन करणे बंधनकारक राहील. संबंधीत यंत्रणा नगर परिषद, नगर पंचायत, अन्न व औषध प्रशासन इ विभागांनी यांचे पालन होत असल्याबाबत वेळोवेळी तपासणी करावी. जर कोविड-19 बाबतच्या नियमाचे पालन न केल्यास त्यांचेवर तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करावी, जिल्हातील नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, ( अत्यावश्यक किराणा, दुध, भाजीपाला व अन्य जिवनावश्यक वस्तु व औषधालय वगळून ) दररोज सायंकाळी 7.00 वाजे नंतर बंद राहतील. याबाबत नगर परिषदेने घ्वनी क्षेपकावर जाहीर करुन दयावी., सर्व दुकानदार, आस्थापनाधारक यांनी व त्यांचे कामगार, कर्मचारी यांची दर पंधरा दिवसाची त्यांची कोविड विषाणू चाचणी करुन त्यांचा अहवाल जवळ बाळगणे बंधनकारक राहील. त्याच प्रमाणे दुकानात गर्दी होणार नाही यांचे आवश्यक ते नियाजन करावे. त्यासाठी सर्वांनी कोविड-19 बाबतचे संबंधीत यंत्रणा नगर परिषद, नगर पंचायत, पोलीस प्रशासन इ विभागांनी योग्य ती दंडात्मक कार्यवाही करावी, संबंधीत यंत्रणा नगर परिषद, नगर पंचायत, पोलीस प्रशासन इ विभागांनी योग्य ती दंडात्मक कार्यवाही करावी कोविड-19 बाबतचे राष्ट्रीय मार्गदर्शन तत्वे सक्तीने पाळवीत व मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता, सोशल डिस्टंसींग इ. चे पालन करणे बंधनकारक राहील. संबंधीत यंत्रणा नगर परिषद, नगर पंचायत, अन्न व औषध प्रशासन इ विभागांनी यांचे पालन होत असल्याबाबत वेळोवेळी तपासणी करावी. जर कोविड-19 बाबतच्या नियमाचे पालन न केल्यास त्यांचेवर तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करावी, जिल्हातील सर्व व्यायामशाळा व जीम पुर्णत: बंद राहतील, सर्व प्रकारच्या धार्मिक सभा, राजकीय सभा, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, मिरवणूक, आंदोलने, मोर्चे,धरणे, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम यावर बंदी घालण्यात येत आहे, जर या आदेशातील सूचनांचे उल्लंधन करणाऱ्या व्यक्ती, समुह, संस्था यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 नुसार कारवाई केली जाईल त्यासोबतच भारतीय दंड संहितेचा कलम 188 नुसार सदर व्यक्ती कायदेशीर कारवाई स पात्र राहील असे जिल्हादंडाधिकारी व अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांनी कळविले आहे.
Leave a Reply