ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

करंजा येथे सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बैठक संपन्न

August 6, 202217:48 PM 15 0 0

उरण (संगिता पवार ) : उरण पोलीस ठाणे हद्दीत करंजा मच्छिमार सोसायटी, करंजा, ता.उरण येथे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत उरण पोलीस ठाणे व सागर सुरक्षा शाखा नवी मुंबई तर्फे सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुरुवार ( दि.४ ) रोजी बैठक घेण्यात आली .
या वेळी भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर . डेविड सिंग, प्रधान अधिकारी ,श्री . सतदेव, सुनील कुमार, ओएनजीसी सिक्युरिटी अधिकारी . स्वप्निल ठाकूर, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी . बाबुलगावे, , करंजा बंदर निरीक्षक,. देविदास जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाखा , नवी मुंबई, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे, उरण पोलिसचे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सुहास चव्हाण व उरण पोलीस ठाणे हद्दीतील सागरी सुरक्षा दल, ग्रामरक्षक दल, मच्छिमार बांधव व पोलीस पाटील एकूण 110 सदस्य उपस्थित होते.

सदर वेळी भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर श्री. डेविड सिंग यांनी उपस्थिताना सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शनपर सूचना दिल्या.
तसेच त्यांचे हस्ते 03 मच्छीमार बांधव, सागरी सुरक्षा दल सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. सदरची बैठक शांततेत पार पडलेली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *