ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

चिरनेर गावात शेती कार्यशाळेचा मेळावा

October 21, 202114:14 PM 10 0 0

उरण संगिता( पवार ) चिरनेर येथील प्राथमिक केंद्र शाळेच्या सभागृहात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत कौशल्य आधारित शेतमजूर प्रशिक्षण वर्ग व प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजना संदर्भात शेतकऱ्यांसाठी शेती कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजीपचे सदस्य बाजीराव परदेशी यांनी भुषविले होते तर व्यासपीठावर उरण पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी पाटील सरपंच संतोष चिर्लेकर ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश फोफेरकर सदस्य संध्या ठाकूर कृषि मित्र शेतकरी प्रफुल्ल खारपाटील कृषी पर्यवेक्षक एन वाय घरत पनवेलचे कृषिनिष्ठ शेतकरी सज्जन पवार विश्वनाथ थवळ कृषी सहाय्यक के .पी, म्हात्रे डी .टी केणी, श्री गाताडी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत कृषि मित्र शेतकरी प्रफुल्ल खारपाटील व कृषी सहाय्यक के.पी म्हात्रे यांनी केले त्यानंतर शेती कार्यशाळेला सुरुवात झाली यात भात तयार होण्याच्या अवस्थेत असताना भाताच्या लोंब्यांवर पडणाऱ्या रोगाची संपूर्ण माहिती व त्यावर करावयाचे उपचार काय व कसे करायचे त्याची संपूर्ण माहिती उपविभागीय कृषी अधिकारी श्री ताटे यांनी दिली तद्नंतर उरण तालुका कृषी अधिकारी शर्मिला जाधव यांनी आळी रोग कसा तयार होतो व इतर वेगवेगळे रोग कसे तयार होतात आणि ते शोधायचे कसे यावर सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला उरण तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *