ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल क्लब ची मीटिंग संपन्न

January 26, 202212:44 PM 42 0 0

उरण (संगिता पवार ) : अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल क्लब (रजि नं. 792/2017) च्या वरिष्ट कार्यकारिणीची वार्षिक सभा सोमवार(दि . 24 ) नेवाळी, तालुका अंबरनाथ येथे पार पडली. समजामध्ये वाढते भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी तसेच आपल्या सभोवतालच्या वाढत्या प्रमाणातील आर्थिक फसवणूक या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जोपासून समाजातील वंचित आणि शोषित व्यक्तिना होणाऱ्या त्रासतुन मुक्त करण्याचे सख्त आदेश टीम मेंबर्स ना देण्यात आले. कोणत्याही ठिकाणी भ्रष्टाचार किंवा गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणूक व ऑनलाइन फसवणूक होत असताना पोलिसांच्या मदतीने ते प्रकरण सोडवून समाजासमोर आणण्याचे काम आपल्या यूनिट मार्फत जलद गतिने होण्यासाठी रात्रणदिवस सर्वांनी काम करण्याचे आदेश श्री. सागर ठाकुर यांनी टीम ला दिले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. सागर ठाकुर, उरण तालुका अध्यक्ष श्री. विजय भोईर, सदश्य श्री. लिलेश्वर ठाकुर, नेवाळी-अंबरनाथ अध्यक्ष श्री. मनोहर पाटिल, सदश्य श्री. चंदन वायले, श्री. फकीर भोईर, श्री. अशोक जाधव, श्री. उमेश सालुंखे, तसेच डॉक्टरी सल्लागार – डॉक्टर श्री. राजेश यादव, इत्यादि टीम मेम्बर्स उपस्थित होते.

समाजातील कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक, लाचखोरी, तसेच भ्रष्टाचाराची माहिती, ऑनलाईन फसवणूक, तसेच सायबर गुन्हेगारी ची माहिती आपण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. सागर ठाकुर ( 9892770246) किंवा [email protected] इथे देवू शकता. तसेच सहभागी होण्यासाठी श्री. विजय भोईर (उरण – 8652578452) श्री. मनोहर ठाकूर ( नेवाळी – 9594618617) संपर्क करु शकता.  भ्रष्टाचार मिटाना है, देश बचना है

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *