ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अँटी करप्शन आणि क्राइम कंट्रोल क्लब ची सभा संपन्न

May 19, 202214:33 PM 28 0 0

उरण(संगिता पवार) : रविवार दिनांक 15 मे 2022 रोजी मु. भेंडखळ, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे सभा संपन्न झाली. महाराष्ट्र, अध्यक्ष श्री सागर ठाकूर यांच्या अध्यक्षते खाली सभा संपन्न झाली. समाजामध्ये आज जे काही राजकीय वातावरण सुरू आहे आणि राजकीय परिस्थिती मुळे सर्वसामान्य माणूस महागाई – बेरोजगारी मध्ये भरडला जाताना दिसत आहे. अशावेळी समाजामध्ये राजकीय हिंसा किंवा वाद घडू नयेत आणि आपण सारे भारतीय आहोत भारतीय म्हणूनच रहायला पाहिजे हे विचार त्यांनी उपस्थितांना पटवून दिले. तर समाजामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सर्वच संघटना उभ्या राहतात मात्र पुरुषांवर सुद्धा कधीकधी अन्याय होताना दिसत असतात. पण अशा पीडित पुरुषांसोबत सुद्धा मागितल्यास मदतीचा हात देवून उभे राहू असे वक्तव्य त्यांनी केले. आज समाजामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत पार्किंग, अनधिकृत प्रवासी वाहतूक त्याचबरोबर बेकायदेशीर जमीन विक्रीतून शेतकऱ्यांची होणारी घोर फसवणूक अशा विषयांवर चर्चा केली.
तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून वारकऱ्यांसाठी छोटेखानी कार्यक्रम करण्याच्या सूचना सर्व सदस्यांना देण्यात आल्या. समाजात चांगले कार्य करून जास्तीत जास्त गरजूंना मदत करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उरण तालुका अध्यक्ष, श्री. विजय भोईर (भेंडखळ) यांनी केले तर या कार्यक्रम प्रसंगी उरण प्रतिनिधी  लिलेश्वर ठाकूर, किरण पाटील,  दिपक भोईर, सतीश सोनलकर (सातारा) कुमारी मनीषा खरात ( उलवे नोड) तसेच अंबरनाथ विभागीय अध्यक्ष,  मनोहर पाटील, सदस्य  उमेश साळुंखे, सदस्य  चंदन मढवी, सदस्य  किरण पाटील, सदस्य अशोक जाधव, आणि सदस्य शशिकांत इटम (पालघर) इत्यादी सहकारी उपस्थित होते. शेवटी सर्वांनी समाजामध्ये होणारी कोणतीही बेकायदेशीर घटना माहीत असताना लपवून न ठेवण्याचे आवाहन महाराष्ट्र अध्यक्ष श्री. सागर ठाकूर यांनी उपस्थित सर्वांना केले. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपणही या संस्थेत सहभागी होऊ शकता. संपर्क कु. मनिषा खरात ( 7219023687) श्री. विजय भोइर (9819836820) श्री. सागर ठाकुर (98927 70246)

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *