ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

टिळकभवन दादर येथे सहकार विभागाची बैठक संपन्न

June 10, 202217:24 PM 27 0 0

जालना (प्रतिनिधी) :  दि.7 जून  2022 ला टिळक भवन येथे ऍड.शुभांगीताई शेरकर राज्यअध्यक्ष सहकार सेल (महाराष्ट्र कांग्रेस पार्टी)यांच्या अध्यक्षतेखाली व मा.प्रांतअध्यक्ष नानाभाऊ पटोले (महाराष्ट्र कांग्रेस पार्टी) यांच्या प्रमुख उपस्थिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ह्या बैठकीस फकिरा वाघ राज्यअध्यक्ष गटविमा गृहनिर्माण कृतीसमिती महाराष्ट्रराज्य यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रतून मोठया संख्येने कृतिसमितीचे सभासद उपस्थित होते. बैठकीत फकिरा वाघ यांनी संघटनेचेच्या वतीने निवेदन देऊन प्रत्यक्ष समस्यावर चर्चा करण्यात आली मुद्दा क्र. 1) साल 2005 पासून आजपर्यंत आम्हाला घराचा ताबा मिळाला नाही.2) घराचे बांधकाम अर्धवट आहे.3) बिल्डर घराचा ताबा देत नाही.घराचा ताबा देण्यासाठी आगाऊ 40 टक्के रकमेची मागणी करतात बिल्डर यांनी परस्पर आमच्या नावावर संपूर्ण रक्कम प्राप्त केलेली आहे.
बिल्डर यांना परस्पर हप्ते वितरित करताना सहकार व पणन व वस्त्र विभागाने शासन निर्णय 2007 प्रमाणे कार्येवही केलेली नाही.तिथेच भ्रष्टाचार झालेला आहे.आम्हाला घराचा ताबा नाही. ताबा दिलेल्या घराचे बांधकाम पूर्ण नाही कर्मचाऱ्यांना सहकार विभागाचे व्याज आणि मुद्दल भरल्याशिवाय पेन्शन मिळत नाही.सहकार विभाग कर्मचारी यांच्या कडुन व्याज व मुद्दल वसुल केल्याशिवाय नादेय प्रमाणपत्र देत नाही.नादेय प्रमाणपत्र सादर केल्या शिवाय सरकारी कार्यालय पेन्शन चालु करत नाही ही सविस्तर माहिती निवेदनात नमुद केली व प्रत्यक्ष माहिती दिली नानाभाऊ पटोले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सहकार राज्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक लावून दोषींवर कार्येवही करून व्याज माफी बाबत गरज पडल्यास अधिवेशनात विषय उपस्थित करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन गटविमा कृतीसमितीला देण्यात आले.
नानाभाऊ पटोले यांनी कर्मचारी यांच्या समस्या सविस्तर ऐकून घेतल्यामुळे कर्मचारी यांचे समाधान झाले नंतर केक कापून पुष्पगुच्छ देऊन नानाभाऊ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या वेळी संघटने पदाधिकारी उपस्थित होते, राज्य उपाध्यक्ष सुभाष शेंगुळे, कार्येध्यक्ष धननजय डोंगरे, जालना जिल्हा अध्यक्ष प्रताप बनकर,दिलिप वाघोळे बबन ,घोडगे संजय निकम, मदन गिरी, बबन जाधव, रमेश गोल्डे व गटविमा गृहनिर्माण कृतीसमितीचे सदस्य उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *