ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जयभीम सेना महाराष्ट्र कलावंत सांस्कृतीक समितीचा मेळावा संपन्न

February 28, 202213:56 PM 40 0 0

जालना (प्रतिनिधी) : जालना तालुक्यातील तांदुळवाडी खुर्द येथे जयभीम सेना महाराष्ट्र कलावंत सांस्कृतीक समितीचा मेळावा आज दि. 27 फेबु्रवारी रविवार रोजी सम्राट कृषी फॉर्म हाऊस येथे जयभीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांच्या उपस्थितीत व सांस्कृतिक प्रदेशाध्यक्ष प्रमोद पाखरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या मेळाव्यास संस्थापक कार्याध्यक्ष रोहिदास गंगातिवरे, संस्थापक सचिव विजय बनकर, संस्थापक संघटक राजीव दळे, ज्येष्ठ नेते सगीर अहेमद रिझवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे म्हणाले की, भारुड, किर्तनकार, वाघ्यामुरळी, तमाशा कलावंतासह सर्व जाती-धर्माच्या शेकडो कलावंतानी आपल्यावर विश्‍वास ठेवून जयभीम सेनेमध्ये प्रवेश केला. आपल्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहील. तसेच वृद्ध कलावंताना मानधन मिळावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. कलावंताना शासन पुर्वी साहित्य वाटप करत होते. जयभीम सेना पार्टी ही शेवटच्या श्‍वासापर्यंत किर्तनकार, भजनी मंडळी व सर्वच कलावंताच्या न्याय हक्कासाठी सोबत राहील असे आश्‍वासन दिले. दि. 15 मार्च 2022 रोजी दुपारी 12 वाजता जालना शहरातील गांधी चमन येथून कलावंत व इतर मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी सर्व जयभीम सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ता व कलावंतांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील निकाळजे यांनी केले. व जिल्ह्यात प्रथमच जयभीम सेनेचा या माध्यमातून एल्गार होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
यावेळी जयभीम सेना महाराष्ट्र राज्य जालना जिल्हाध्यक्ष विनोद म्हस्के, जयभीम सेना पार्टी जिल्हा युवा अध्यक्ष  सुभाष लिहिणार, युवानेते कैलास बनसोडे, कामगार नेते दिपक दांडगे, संतोष रत्नपारखे, विठ्ठल मोरे, आकाश म्हस्के, रत्नदीप मोरे यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *