ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अंबड येथे ऊस उत्पादक शेतकर्‍यांंची बैठक संपन्न

May 14, 202212:54 PM 30 0 0

अंबड : अंबड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची बैठक आज १३ मे रोजी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीमध्ये अंबड-घनसावंगी तालुक्यातील ऊस समर्थ सहकारी साखर कारखाना आणि सागर सहकारी साखर कारखाना गळीत क्षेत्रातील ऊसाचे होत नाही तोपर्यंत समर्थ आणि सागर सहकारी साखर कारखाने बंद होऊ देणार नसल्याची भुमिका अंबड-घनसावंगी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी घेतली. आजच्या अंबड येथील बैठकीत सुध्दा ठाम भुमिका घेण्यात आली. अशा प्रकारे बैठका अंबड- घनसावंगी तालुक्यात ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या गट-गण निहाय घेण्यात येत असल्याचे ऊस उत्पादक सहकार कायद्याचे अभ्यासक अ‍ॅड. भास्करराव मगरे यांनी सांगितले. समर्थ आणि सागर सहकारी साखर कारखाने समोर अतिरिक्त ऊस प्रश्नी आंदोलन होणारच या प्रसंगी ऊस उत्पादक शेतकर्‍यांची उपस्थितीतून यावेळी मोठ्या संख्येने अंबड-घनसावंगी तालुक्यातील उस उत्पादक शेतकरी उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *