जालना (प्रतिनिधी) : जालना (प्रतिनिधी) :तालुक्यातील मौजपुरी ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी काल सोमवारी आ. कैलास गोरंट्याल यांची त्यांच्या प्रितीसुधानगर मधील निवास स्थानी सदीच्छा भेट घेतली. यानंतर त्यांच्या आ. गोरंट्याल यांनी पुष्पहार देवुन सत्कार केला. पॅनल प्रमुख बंडूकाका डोंगरे, बालाजी बळप, अच्युत मोरे, माजी उपसरपंच प्रभाकर डोंगरे, नारायण डोंगरे, निवृत्ती जाधव, बळीराम गायकवाड, कृष्णा हिवाळे यांच्या नेतृत्वाखालील मौजपुरी ग्रामपंचायतची निवडणुक लढवून निवडणूकीत एकहाती सत्ता काबिज केली होती.
मौजपुरी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सौ. ज्योतीताई भागवत राऊत, उपसरपंच सत्यनारायण ढोकळे यांच्यासह बद्रीनारायण भसांडे, संतोष मोरे, सौ. लता बंडू काळे, सौ. सविता राम जाधव, सौ. मिरा नारायण गायकवाड यांनी आ. कैलास गोरंट्याल यांची काल सोमवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट घेत काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला असल्याचे भागवत राऊत यांनी म्हटले आहे.
यावेळी पॅनल प्रमुख बंडूकाका डोंगरे, बालाजी बळप, अच्युत मोरे, माजी उपसरपंच प्रभाकर डोंगरे, नारायण डोंगरे, निवृत्ती जाधव, बळीराम गायकवाड, कृष्णा हिवाळे यांची उपस्थिती होती.
तालुक्यातील मौजपुरी ग्रामपंचायत आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखालील असताना व एकहाती सत्ता काबिज केली असताना नवनिर्वाचीत सदस्यांची दिशाभूल करून त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. मात्र काल सोमवारी सरपंचासह सदस्यंनी आ. कैलास गोरंट्याल यांची भेट घेतली यावेळी आ. कैलास गोरंट्याल यानी सरपंचासह सदस्यांना सत्कार केला.
मौजपुरी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सौ. ज्योतीताई भागवत राऊत, उपसरपंच सत्यनारायण ढोकळे यांच्यासह बद्रीनारायण भसांडे, संतोष मोरे, सौ. लता बंडू काळे, सौ. सविता राम जाधव, सौ. मिरा नारायण गायकवाड यांनी आ. कैलास गोरंट्याल यांची काल सोमवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट घेत स्वगृही म्हणजेच काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला असल्याचे भागवत राऊत यांनी म्हटले आहे.
यावेळी पॅनल प्रमुख बंडूकाका डोंगरे, बालाजी बळप, अच्युत मोरे, माजी उपसरपंच प्रभाकर डोंगरे, नारायण डोंगरे, निवृत्ती जाधव, बळीराम गायकवाड, कृष्णा हिवाळे यांची उपस्थिती होती.
Leave a Reply