जालना : असोसिएशन ऑफ स्मॉल ऍण्ड मिडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाच्या जालना जिल्हा शाखेच्या वतीने जालना जिल्ह्यातील पत्रकारांची नोंदणी सुरु करण्यात आली असून पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येने नाव नोंदणी करुन सभासद व्हावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केले आहे.
या संदर्भातील प्रसिध्दी पत्रकारत श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, असोसिएशन ऑफ स्मॉल ऍण्ड मिडियम न्यूज पेपर ऑफ इंडिया ही राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांसाठी काम करणारी संघटना आहे. पत्रकारांच्या अडीअडचणी, त्यांचे न्याय- हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणारी ही संघटना जालना जिल्ह्यात देखील अत्यंत जोमाने कार्यरत आहे. या संघटनेत सहभागी होऊन पत्रकारांनीही त्यांच्यावर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या संघटनेत सहभागी व्हावे. या संघटनेत सदस्यत्व मिळवण्यासाठी पत्रकारांना ते कार्य करत असलेल्या वृत्तपत्राचे आरएनआय प्रमाणपत्र, वार्षिक एनिवल रिपोर्ट , आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणि दोन पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहेत. सदस्यत्व मिळवण्यासाठी पत्रकार, संपादक आणि कार्यकारी संपादकांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकासकुमार बागडी (९४२२२१८७०४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Leave a Reply