ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ताराराणी ब्रिगेड च्या सदस्यांनी खोपोली पोलीस स्टेशन मध्ये साजरे केले रक्षा बंधन

August 17, 202214:58 PM 13 0 0

खोपोली  (कु. अदिती पवार)  :शहरात उन , वारा , पाऊस, वादळ , कडाक्याची थंडी , विविध जातीधर्माचे विविध उत्सव , मिरवणूका असोत अशा वेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी डोळ्यांत तेल घालून चोवीसतास शहरातील त्या प्रत्येक नागरिकांच्या रक्षणासाठी तत्पर असणार्या पोलीस बांधवांना अनेकदा कर्तव्यापोटी आपल्या कुटुंबीयांसमवेत सण व उत्सव साजरे करता येत त्यामुळे महिलांच्या खर्या अर्थाने रक्षणकर्ता असलेल्याने ताराराणी ब्रिगेड च्या रायगड जिल्हातील खोपोली शहर पदाधिकार्यानी खोपोली पोलीस स्टेशन च्या पोलीस बंधू भगीनींना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
यावेळी ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष शिवमती कविता खोपकर, रायगड जिल्हा अध्यक्षा वर्षाताई मोरे, खालापूर तालुका अध्यक्ष किशोरी चेऊलकर, खालापूर तालुका कार्याध्यक्ष नीलम समेळ, खोपोली शहर अध्यक्षा वर्षाताई वडजे, खोपोली शहर उपाध्यक्ष संगीता परदेशी, खोपोली शहर सचिव कल्पना यादव व इतर मान्यवर सदस्या उपस्थित होत्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *