ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

स्त्रियांच्या मासिक पाळीत अनियमितता

August 28, 202114:47 PM 79 0 13

नमस्कार मी डॉक्टर वसुधा कर्णे, दहिवडी येथे स्त्रीरोग चिकित्सक म्हणून कार्यरत आहे. आज पासून आपण आरोग्य विषयक सदर घेऊन येत आहे. यामध्ये प्रामुख्याने स्त्रियांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची चर्चा आपण करणार आहोत. आजच्या या प्रथम पुष्पात आपण ‘स्त्रियांच्या मासिक पाळीत अनियमितता’ या विषयावर बोलूयात.
आजकाल पाळीची अनियमितता ,वाढणारे वजन या अतिशय कॉमन तक्रारी झालेल्या आहेत. बऱ्याच स्त्रिया ,मुली या प्रकाराला बळी पडतात. या आजाराला pcod म्हणजे पॉलिसिस्टिक ovarian डीसिज म्हणतात.Pcos म्हणजे पॉलिसिस्टिक ovarian सिंड्रोम यात मुख्यत्वे चेहऱ्यावर मुरूमे येणे ओठांवर व शरीरावर इतरत्र अनावश्यक केस येणे, लठ्ठपणा किंवा अती बारीक शरीर यष्टी आणि मासिक पाळीचे चक्र अतिशय अनियमित असणे अशी लक्षणे दिसतात.या त्रासाने बहुतेक स्त्रिया ग्रासलेल्या आहेत. स्त्रियांचे शरीर हे एक अजब रसायन आहे. स्त्रियांच्या शरीरात मुख्यत्वे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची निर्मिती होत असते .या हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये जर काही कारणाने बिघाड झाला तर पाळीचे चक्र बिघडते.


आता आपण याची नक्की कारणे काय ते पाहूयात. वयात येण्याच्या काळात पोषणाची कमतरता आणि योग्य व्यायामाची कमतरता हे दोन महत्त्वाचे घटक
हॉर्मोन्सच्या निर्मितीमध्ये बदल बदल घडवतात .हल्ली मुलगी वयात येण्याचे वय 1५ ते 16 वरून आठ ते दहा वर्षांपर्यंत खाली आलेले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राहणीमानात झालेला बदल.
त्यामुळे होत काय, सध्या चौथी पाचवी मुलींना मासिक धर्म सुरू होतो आणि जेव्हा या मुली मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या खूपच अपरिपक्व असतात. आणि त्यांना या शरीर धर्माविषयी कसलीही ज्ञान नसते .काही ठिकाणी मासिक धर्म चालू होताच मुलींना क्रीडा प्रकारात भाग नाकारला जातो. काहींना घराबाहेर सर्व प्रकारच्या व्यायाम प्रकारात भाग घ्यायला बंदी केली जाते. तर काही ठिकाणी मुली स्वतःच मासिक धर्म सुरू होताच शक्यतो व्यायाम टाळतात .याच बरोबर आहार खूप महत्त्वाचा आहे. मुली बारीक राहण्याच्या नादात अतिशय कमी पोषणमूल्य असलेला आहार घेतात.क्रॅश डाएट घेतात.तर शहरी भागात फास्ट पुढचे खुळ सुद्धा खूप घातक ठरत आहे .हे सर्व टाळण्यासाठी सर्व स्त्रिया आणि मुलींनी पुरेशा प्रमाणात लोहयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे रोजच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात पालेभाज्या, फळे ,गुळ, शेंगदाणे, खजूर ,राजगिरा, मोड आलेली कडधान्य, अंडी ,पनीर, दूध व दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश असावा. कार्बोहायड्रेट आणि प्रथिने युक्त आहार टाळावा. पुरेशा प्रमाणात प्रथिनयुक्त आहार घ्यावा व्यायाम खूपच महत्त्वाचा आहे. रोज किमान तीन ते पाच किलोमीटर चालण्याचा व्यायाम करणे गरजेचे आहे. ज्यांना चालायला जाणे शक्य नाही, त्यांनी किमान घरी योगासने किंवा सूर्यनमस्कार घालावेत. आणि गरज लागेल तेव्हा वैद्यकीय सल्ल्याने औषधांचा वापर करावा.
अशा रीतीने आपण पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डीसीज या आजारावर मात करू शकतो.
डॉक्टर वसुधा कर्णे
दहिवडी.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *