ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बीजवडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

December 17, 202112:54 PM 65 0 0

सातारा,विदया निकाळजे : बिजवडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ग्रंथप्रदर्शन ,रांगोळी प्रदर्शन, निबंध प्रदर्शन, व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. डॉ. सुरेश साळुंखे प्राचार्य दहिवडी कॉलेज दहिवडी यांनी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केले . विद्यालयाची प्रगती व उपक्रमांचे कौतुक केले. विद्यालयातील इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला .माण तालुका दुष्काळी असला तरी गुणवंतांची खान आहे असे गौरवोद्गार काढले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रदीप कुमार शिंदे जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा यांनी मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कार्याचा आढावा घेतला . मुख्याध्यापिका सौ रेखा पवार यांनी शरदचंद्र पवार साहेबांच्या आयुष्यातील बालपणीचे प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यालयात आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला पैकी 81 निवडक निबंधाचे प्रदर्शन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रमास स्कूल कमिटीचे सदस्य श्री दौलतराव जाधव श्री विठ्ठलराव भोसले उपस्थित होते तसेच हनुमंत राव भोसले,माजी विद्यार्थ्यी प्रशांत विरकर ,उपसरपंच योगेश भोसले पत्रकार विशाल गुंजवटे दहिवडी कॉलेजचे प्राध्यापक श्री शिंदे सर, पालक वर्ग व ग्रामस्थ हजर होते. कार्यक्रमाचे आभार श्री बिडवे सर यांनी मानले व सूत्रसंचालन श्रीमती काशिद मॅडम व दोरगे सर यांनी केले.हर्षदा देशमुख/जाधव जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा यांनी प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *