मुरूड जंजिरा ( सौ नैनिता कर्णिक) नक्षत्रांचे देण काव्यमंच आयोजित दिनांक २२/०८/२०२१ रोजी कै.धोडींबा फुगे मैदान, विरंगुळा केंद्र, दिघी रोड, भोसरी, पुणे–३९ या ठिकाणी सर्व गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.या वेळी प्रा .राजेंद्र दशरथ सोनावणे राष्ट्रीय अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
राखी पौर्णिमा निमित्त भोसरी परिसरातील ४० शाळेतील पहिल्या ५ मध्ये आलेले गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक यांचा सत्कार सोहळा प्रा राजेंद्र दशरथ सोनावणे ,लायन्स अशोक येवले ,अॅड प्रफुल्ल भुजबळ,अमर फुगे, दत्ता हुले, रामदास हिंगे, मोहन कुदळे,कवी वादळकार इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.सत्कार झालेल्यांनी आयोजक संयोजक यांना धन्यवाद दिले.आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Leave a Reply