जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाचनवडगाव तालुका जालना अंतर्गत सारवाडी या शाळेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर गिराम यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून याच केंद्रातील प्रा. शा. पोकळवडगाव येथील प्राथमिक पदवीधर शिक्षक श्याम पवार यांनादेखील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
उद्या दिनांक 26 सप्टेंबर 21 रोजी देवमूर्ती जवळील अक्षय मंगल कार्यालय नाव्हा रोड या ठिकाणी दुपारी बारा वाजता सदरील पुरस्काराचे वितरण जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जिंदल यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थित देण्यात येणार आहे. या दोन्ही पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे केंद्रातील सर्व शिक्षक, गावकरी, पालक आणि मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे.
Leave a Reply