ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिलन पाटील व शुभांगी बाबर यांचा राष्ट्रीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्काराने गौरव

December 2, 202115:25 PM 52 0 1

सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी (सौ.संपदा बागी-देशमुख) :  स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन यांच्यामार्फत सिंहगड इंस्टिटयूट लोणावळा येथे दि.८ व ९ नोव्हेंबर या कालावधीत नॅशनल लेव्हल एज्युकेशन कॉन्फरन्स यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी संपूर्ण भारतातून उपक्रमशील शिक्षक उपस्थीत होते. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार वितरीत करण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातील सौ. मिलन गोपाळ पाटील व सौ. शुभांगी संतोष बाबर या दोन शिक्षिकांना शिक्षणाधिकारी मा. डॉ.सौ. सुचिता पाटेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सौ. मिलन गोपाळ पाटील यांच्या ” प्रश्नोत्तर हजेरी ” या नवोपक्रमाची निवड करण्यात आली तर, सौ. शुभांगी संतोष बाबर यांचा “Creative English For Enhancing Communication Skill of Primary Student “. या नवोपक्रमांची निवड करण्यात आली. सदर कॉन्फरन्समध्ये देशभरातील उपक्रमशील शिक्षकांचे नवोपक्रम सादरीकरण झाले. त्यापैकी निवडक शिक्षकांना नॅशनल लेव्हल इनोव्हेशन आवार्डने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात संवेदनशील कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. अध्ययन व अध्यापन करतांना कोणत्या अडचणी येतात हे जाणून घेवून त्यांनी त्याबद्यल सूचना कराव्यात, त्यावर तोडगा काढावा हे यात अपेक्षित असते.
या प्रसंगी डॉ. ह. ना. जगताप,शिक्षणाधिकारी मा. डॉ. सुचिता पाटेकर असे शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. सौ. मिलन पाटील व सौ. शुभांगी बाबर यांनी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक कार्याची नोंद सर फाउंडेशन या संस्थेने घेऊन त्याना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित केले. याबद्यल यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे. सौ. मिलन पाटील व सौ. शुभांगी बाबर या उपक्रमशील शिक्षिकांना सन्मा. केंद्रप्रमुख श्री. सूर्यकांत नाईक सर, केंद्रप्रमुख श्री. डि.एन. पावरा सर, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. छाया बाळेकुंद्री मॅडम व गटशिक्षणाधिकारी मा. श्री. निसार नदाफ साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *