ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बुलडाण्यातील मायलेकाची अकोल्यात आत्महत्या

April 15, 202116:20 PM 50 0 0

अकोला : अकोला जिल्ह्यातील मन नदीत 15 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यातच, तरुणासोबतच त्याच्या आईनेही नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं. मायलेकाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दोघेही जण बुलडाण्याचे रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील मन नदीत 15 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. तर त्याच्या आईचा मृतदेह शोधायला संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाला बोलवण्यात आले. मयत मायलेक बुलडाणा जिल्हातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दोघांनी घरगुती कारणातून आत्महत्या केली की अन्य कुठल्या कारणाने, याचा तपास बालापुर पोलीस करत आहेत. मात्र मायलेकाचा मृतदेह मन नदीतून बाहेर काढला जात असताना पुलावर बघ्यानी गर्दी केली होती.

नांदेडमध्येही मायलेकाची आत्महत्या

दरम्यान, कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीने मुलासह आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात घडल्याचे समोर आले आहे. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान पतीची प्राणज्योत मालवल्याचं समजताच पत्नीने थेट तलाव गाठला. दोन मुलींना घरी ठेवून तिने धाकट्या मुलासह आयुष्य संपवलं.

नेमकं काय घडलं?

तेलंगणातून गंदम कुटुंब नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात मजुरीसाठी आलं होतं. बालाजी मंदिराच्या पाठीमागे राहून मजुरी करत ते उदरनिर्वाह करत होते. दरम्यानच्या काळात 40 वर्षीय पती शंकर गंदम यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांना लोहा येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु मंगळवारी उपचारादरम्यान शंकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

पतीच्या निधनाची बातमी समजताच पद्मा गंदम यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या पश्चात जगण्याची कल्पना असह्य झाल्याने त्यांनीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांचा मुलगा लल्ली याच्यासह पद्मा यांनी सुनेगाव येथील तलाव गाठलं. दोघी मुलींना घरी ठेवून त्यांनी धाकट्या लेकासह तलावात उडी घेतली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *