वर्षानुवर्ष समाजाच्या रुढी आणि परंपरा जोपासत आलेल्या समाजातील अनिष्ट चालीरीतांना पायदळी तुडवित दिनदुबळ्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपुर्ण आयुष्य बहुजनांच्या सुखासाठी समर्पीत केले. बहुजन म्हटले तर केवळ एखादी जात नव्हे तर अनेक जातीधर्मासाठी म्हणजेच अनेक जातींसाठी(बहुजनांसाठी) त्यांनी योगदान दिले आहे. देशातल्या प्रत्येकाचे अधिकार आणि हक्क सुरक्षीत ठेवण्यासाठी तसेच देशातल्या प्रत्येकाला न्याय, समता आणि बंधुता प्रदान केली आहे. वर्षानुवर्षे गावकुसाबाहेर राहणार्यांना गावात सन्मानाने राहण्याचा, जगण्याचा, शिक्षणाचा हक्क दिला. चुल आणि मुल अशी परंपरा जोपासणार्या पुरुषप्रधान संस्कृतीला बाजुला करीत महिलांना देखील पुरुषांसारखा जगण्याचा आणि वावरण्याचा हक्क आहे. शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात काम करण्याचा अधिकार देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिला आहे. त्यांचे देशावर आणि देशातल्या प्रत्येकावर असलेले उपकार हे कधीही न फिटणारे उपकार आहेत. त्यांच्यामुळेच आज देशातली नारीशक्ती आपले विविध क्षेत्रात वर्चस्व दाखवत आहे. महिलांना मान सन्मान आणि हक्क मिळवून देणारे डॉ. बाबाहेब आंबेडकर हे गोरगरीबांसह महिलांच्या उद्धारासाठी जन्माला आलेला हिरा हा 6 डिसेंबर 1956 रोजी आम्हा सर्वांना पोरका करुन गेला.
अशा या महामाणवास त्रिवार अभिवादन !
Leave a Reply