ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस तातडीने अटक केल्याबद्दल सातारा पोलीस दलाचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले विशेष कौतुक

March 29, 202213:04 PM 22 0 0

सातारा हिरकणी(विदया निकाळजे): अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस सातारा स्थानिक गुन्हे शाखा, सातारा तालुका पोलीस, सातारा शहर पोलीसांनी तपास करुन तातडीने अटक केली. त्याबद्दल या तिन्ही पोलीस पथकास गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज त्यांच्या निवासस्थानी बोलवून त्यांचे विशेष कौतुक केले. योवळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहा. पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, विश्वजीत घोडके, भगवान निंबाळकर व पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद असून अशा अत्याचार करणाऱ्या आरोपीस सातारा पोलीस दलाने तात्काळ तपास करुन गुन्हा दाखल केला आहे. समाजातील अपप्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी पोलीसदल नेहमीच आपले कर्तव्य बजावित असतात. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा शहर पोलीस व सातारा तालुका पोलीस यांनी संयुक्त प्रयत्न करुन आरोपीस तात्काळ अटक केलेली आहे. त्याबद्दल या तिन्ही टीमचे मी माझ्या निवासस्थानी बोलावून विशेष कौतुक करीत आहे.
सातारा येथे नुकत्याच अल्पवयीन मुलीचा शारिरीक अत्याचार करुन सोनगाव ता. जि. सातारा येथील पॉलिटेक्नीक कॉलेज जवळील निर्जन भागात सोडून आरोपी पळून गेला होता. गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेऊन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा पोलीस दलाला तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहा. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनीही घटनास्थळी तातडीने भेट देउन याचा तपास करण्यास सुरुवात केली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सातारा तालुका पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सातारा शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या संयुक्त पथकाने उघडकीस आणला आहे.
याप्रसंगी सातारा तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक घोडके, सहा. पोलीस निरीक्षक चौधरी, पोलीस उप निरीक्षक दळवी, पाटील, सहा पोलीस उपनिरीक्षक वंजारी, पोलीस हवालदार परिहार, हंकारे, पवार, डोबाळे, पोलीस नाईक महंगाडे, शिखरे, चव्हाण, कुंभार तसेच सातारा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पीएसआय कदम, पोलीस नाईक सुजित भोसले, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, सागर गायकवाड, विशाल घाडगे, पंकज ढाणे, ज्योतीराम पवार, निलेश गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, विश्वनाथ सपकाळ, प्रवीण फडतरे, मंगेश महाडिक, लक्ष्मण जगधने, प्रमोद सावंत, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, प्रवीण कांबळे, गणेश कापरे, अमित सपकाळ, शिवाजी भिसे, अमोल माने, मोहन पवार, मयूर देशमुख, केतन शिंदे, रोहित निकम, प्रवीण पवार, पृथ्वीराज जाधव, शरद बेबले यांचा सत्कार करण्यात आला .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *