ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवसैनिकांना सामाजिक कार्य करण्यासाठी ताकद देणार- गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

August 2, 202115:27 PM 46 0 0

सातारा,(विदया निकाळजे) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे असून त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून जनतेची कामे करण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देणार असल्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी फलटण येथे दिले.


फलटण येथे एका खासगी दौऱ्यानिमित्त फलटण जिल्हा सातारा येथे विश्राम गृहात शिवसैनिकांशी श्री देसाई यांनी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते.
आगामी काळात फलटण तालुक्यातील शिवसेना शाखा स्थापन करून पक्ष बळकटीसाठी विशेष प्रयत्न केले जातील मी स्वतः या कामासाठी प्रयत्नशील राहील असेही आश्वासन श्री देसाई यांनी दिले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि राज्यावर महापूर ,कोरोना सारखी अकस्मात संकटे आली तरीही आम्ही धीर न सोडता या संकटांशी लढा देत आहोत.
कोणत्याही परिस्थितीत सरकार लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असेही मा गृहराज्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
शिवसैनिकांना सामाजिक कार्य करण्यासाठी ताकद देणार- गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *