ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राज्यमंत्री शंभुराज देसाई यांची जालना पोलीस दलावर कौतुकाची थाप; आढावा बैठीत पोलीसांची कामगीरी चांगली असल्याचे व्यक्त केले मत

May 1, 202122:15 PM 72 0 0

जालना (प्रतिनिधी) ः राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व पणन राज्यमंत्री शंभूराज शिवाजीराव देसाई यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कोरोना प्रादुर्भाव आणि पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा बैठक घेतली असून या आढावा बैठकी दरम्यान पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर समाधान व्यक्त करीत जालना पोलीस दलावर कौतुकाची थाप दिली. तसेच जालना जिल्ह्यातील पोलीसांची कामगीरी चांगली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

जालना येथे पोलीस अधिक्षक कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी संपुर्ण राज्यात 15 मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यात या निर्बंधाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस प्रशासनाला देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व पणन राज्यमंत्री शंभूराज शिवाजीराव देसाई यांनी दिले असल्याचे यावेळी सांगीतले.


यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी श्रीमती भाग्यश्री जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जालना जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना गुन्हा घडल्यानंतर व तक्रार प्राप्त झाल्यानंतर तो दाखल करुन घेतलाच नाही अशी परिस्थिती आढाव्या दरम्यान आढळुन आली नाही. घडलेल्या गुन्ह्यांचा शोध व प्राप्त तक्रारींचा निपटारा ही प्रक्रिया जालना जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात येत आहे. कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांना सकाळी 11 नंतर सुरु ठेवण्यास मनाई केली आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या तसेच विनाकारण गर्दी करणारे, विनाकारण रत्यावर फिरणे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणे अशा व्यक्तींवर जिल्हा पोलीस दलामार्फत मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या आहेत. याकामी प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्‍यांची मोठी मदत मिळाली. गतवर्षातील लॉकडाऊनमध्ये व सध्याच्या कडक निर्बंधामध्ये कोव्हीडसंदर्भातील जबाबदारी पार पाडत असताना जिल्हा पोलीस दलातील पाच अधिकारी, कर्मचार्‍यांचे दुर्देवी निधन झाले. निकषात बसणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांना शासनामार्फत मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशिल. असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. कोव्हीडच्या काळात जबाबदारी पार पाडणार्‍या प्रत्येक अधिकारी, कर्मचार्‍यांना फिल्डवर काम करावे लागते. या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या असुन प्रत्येक अधिकारी, कर्मचार्‍यांना मास्क, सॅनिटायजरसह ईतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. यामध्ये काही कमतरता भासल्यास पोलीस महासंचालक कार्यालयाकडून साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार.
गत पंधरा दिवसांमध्ये राज्यात कडक निर्बंध लावल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस हे निर्बंध अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना पोलीस विभागास देण्यात आल्या आहेत.

समाधान न झाल्यास लेखी कळवा पुन्हा चौकशी करतो
यावेळी काही पत्रकारांनी तालुका पोलीस ठाण्याच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत वरीष्ठ अधिकार्‍यांची दिशाभुल केली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. लेखी दिलेल्या तक्रारीवर आणि हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीसांकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यावर पोलीसांनी कार्यवाही केल्याचे पोलीस अधिक्षक यांनी सांगीतले. त्यावर तक्रारदार जर पोलीस अधिक्षक यांच्या कार्यवाहीवर समाधानी नसेल तर लेखी तक्रार दाखल करावी त्याची पुन्हा चौकशी करायला लावतो असे आश्वासन राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व पणन राज्यमंत्री शंभूराज शिवाजीराव देसाई यांनी दिले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *