उरण (संगिता पवार ) उरण मधील मोरा बंदराजवळील भवरा आदिवाशी वाडीतील मच्छिमार राजू रमेश कातकरी वय वर्ष ३२ हा 4 जूलै पासून बेपत्ता आहे.त्याबाबत त्याचे वडील रमेश रामा कातकरी, यांनी 21 जूलै रोजी मोरा पोलिसस्टेशन मध्ये दाखल केली आहे.पण आजपर्यंत त्याचा ठावठिकाणा लागला नसल्याचे मोरा पोलीस ठाण्यातून व त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.
राजू हा मच्छिमारी करुन आपल्या कुटूंबाची गुजराण करत होता. 5फूट 6 इंच उंच व सावळा रंग व काळे केस आसलेला राजू हा कामाला जातो आसे सांगून 4 जूलै रोजी सुरेश वाल्मिकी यांच्या नावावर आसलेली चाॅकलेटी रंगाची अॅक्टीवा क्र .एम.एच 46 ए डब्ल्यु 3513 घेवून घरातून निघाला.त्यावेळी ,त्याची दाढी मिशी वाढलेली होती तर अंगात नेसूस सफेद रंगांचा फूल बाह्यांचा टि शर्ट ,निळ्या रंगाची जिन्स पॅंट व,पायात काळ्या रंगाची सॅंडल परिधान केली होती.
गेले काही दिवस त्याचा सर्व नातेवाईकांकडे तपास केला असतो तो सापडला नाही शेवटी त्याचे वडील रमेश कातकरी यांनी 21 जूलै रोजी मोरा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या तक्रारी बाबत मोरा पोलीसांनी अनेक ठिकाणी तपास केला आसून राजू कातकरी चा ठावठिकाणा आजतागायत लागला नाही.तसेच पोलीसांकडून अवाहन करण्यात आले आहे कि वरिल वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास मोरा सागरी पोलीस ठाणे अथवा जवळील पोलीस ठाण्यात कळवावे.
Leave a Reply