उरण ( संगिता पवार ) : उरण तालूक्यातील प्राईड व्हिला ,रूम न.१०१ प्लॉट न. 99 सेक्टर १५ फुंडे तालुका उरण येथे राहणारी मुलगी कुमारी प्रणवी आकाराम राजगे वय वर्षे १८ हि राहत्या घरातून ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ९.४५ दरम्यान फुंडे कॉलेज येथे एफवायबीए चे अॅडमिशन घेण्या करिता जाते असे सांगून गेली .ती आज पर्यंत घरी परत आली नाही .
न्हावा -शेवा पोलीस ठाण्यात महिला मिसिंग क्र. २९ /२०२१ अशी नोंद करण्यात आली आहे . कुमारी प्रणवी आकाराम राजगे वय वर्षे १८ असून रंग सावळा आहे.केस काळे कुरळे लांब ,नाक बसके ,डोळे काळे ,मजबूत बांधा ,अंगात पिवळ्या रंगाचा कुर्ता ,लाल रंगाची लेंगीज ,व काळ्या रंगाची ओढणी ,पायात उंची सॅडल, उंची ५ फुट ५ इंच भाषा मराठी ,हिंदी बोलते ,सोबत अॅडमिशन घेण्यासाठी तीन हजार घेतलेले आहेत ,अश्या वर्णाची महिला कुणासआढळली तर न्हावा -शेवा पोलीस ठाणे फोन -०२२ -२७४७२२६४ या वर माहिती द्यावी .न्हावा -शेवा पोलीस तपास करीत आहेत .
Leave a Reply