जालना, प्रतिनिधीः रक्तदान चवळीत सक्रिय असलेल्या स्वयंभू ग्रुपच्या वतीने रविवारी मिशन थॅलेसेमियासाठी रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिरात 23 पुरूष व 7 महिला मिळून 30 जणांनी रक्तदान केले. जनकल्याण रक्तपेढीत हे शिबीर घेण्यात आले.
दरवर्षी 11 जुलै रोजी ग्रुपचे सदस्य स्व.सोमनाथ चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे शिबीर घेऊन रक्तदान शिबीर व रक्तदानाबाबत जनजागृती करण्यात येते. या शिबिरात अन्यन्या लांबे, अनुष्का लांबे, मेघा देशपांडे, शुभांगी जोशी, प्रेरणा कुलकर्णी, सपना अग्रवाल, प्रदीप मोहरील, अभिजित देशपांडे, ज्ञानेश्वर राऊत, जयप्रकाश मुंदडा, किरण कोकाटे, गणेश शर्मा, विनायक मानकस, वैभव देशमुख, सौरभ नगरकर, योगेश देशपांडे, राम घटमल, अभिजित जोशी, आदित्य जोशी, विजय जोशी आशीष जोशी, मंगेश सुरंगळीकर, मुकेश महाजन, नितीन देशपांडे, जितेंद्र कांबळे, अजिंक्य कोळेश्वर, महेश दर्प, राजू गोगडे, अनुप टापर यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी पंकज कुलकर्णी, विजय सोळुंके, विनोद कुलकर्णी, मुकुंद गोंदीकर, द्वारकानाथ परळीकर, मिलिंद लांबे, दीपक म्हारोळकर, सिद्धेश्वर पिंपरकर आदींनी परिश्रम घेतले.
Leave a Reply