ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतली भेट

August 23, 202115:11 PM 15 0 0

मोर्शी तालुका प्रतिनिधी : वृद्धापकाळामुळे मोतिबिंदू ही समस्या निर्माण होत असून या समस्येमुळे त्या व्यक्तीचे दृष्टीपटल धुरकट झाल्यामुळे त्याला स्पष्ट दिसू शकत नाही. ग्रामीण भागातील वृद्ध नागरिकांना दैनंदिन कामे करण्यास अडचणी येऊ लागल्यामुळे मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते.

मात्र ग्रामीण भागामध्ये रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे वेळेवर त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नाही वेळेवर उपचार न मिळाल्यास डोळे गमावण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी रुग्णसेवेचा वसा घेतलेले मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका, डॉ महात्मे नेत्रपीढी नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्शी येथे भव्य नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ३५० रुग्णांची तपासणी केली असता १११ रुग्णांच्या डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी २६ रुग्णांची पहिली बॅच रुग्णसेवक अमर नागले यांच्यासोबत महात्मे नेत्र पेढी नेत्र रुग्णालय नागपूर येथे पाठवून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीबद्दल आणि औषधोपचार आणि मिळालेल्या सेवा सुविधे बद्दल विचारपुस करून वैद्यकिय अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी सर्व रुग्णांणी आमची काळजी घेऊन निशुल्क शस्त्रक्रिया करून दिल्याबद्दल आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.
या रुग्णसेवेकरिता नगराध्यक्षा सौ मेघनाताई मडघे, डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, माजी न.प. उपाध्यक्ष मोहन मडघे, शहर अध्यक्ष तमीज भाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंकुश घारड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हितेश साबळे, रुपेश मेश्राम, नगरसेविका सौ विद्या ढवळे, प्रतिभा महल्ले, दीक्षा गवई, सुनीता कोहळे, मयूर राऊत, स्नेहा जाने, विनोद ढवळे, शेर खा, दिलीप गवई, आनंद तायडे, देवेंद्र खांडेकर, पंकज राउत, राधेश्याम पैठणकर, बंटी नागले, राहुले धुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ३५० रुग्णांची भव्य डोळे तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *