सातारा,(विदया निकाळजे) : कोरोनाचा वाढता प्रभाव ,पर्यावरणाचा होणारा ऱ्हास ,माझे मुल माझी जबाबदारी ,मतदार नोंदणी इत्यादी विषयी जनजागृती करण्यासाठी माण तालुक्याचे प्रांताधिकारी श्री शैलेश सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून ऑफ रोड म्हणजेच माणगंगा नदीच्या पात्रातून 10 किमी पिंकॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.माणदेशी मेडिकल असोसिएशन दहिवडी,माणदेशी मॅरेथॉन वडूज आणि प्रांताधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
स्पर्धेचा प्रारंभ म्हसवड येथील माणगंगा नदीच्या पात्रातून होऊन पळशी येथे समाप्त झाली. स्पर्धेत अनेक मान्यवरांनी स्पर्धक म्हणून हजेरी लावली हे पाहून अनेक स्पर्धक हिरिरीने सहभागी झाले. स्पर्धेत आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने स्पर्धकांच्या चहापानाची व नाष्ट्याची सोय करण्यात आली. सदर स्पर्धेत माण चे आमदार जयकुमार गोरे,तहसीलदार बी एस माने,प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी,डॉ संदिप पोळ, डॉ अजय व डॉ वसुधा कर्णे, डॉ प्रदिपकुमार व डॉ सुनिता पालवे, डॉ.डोंबे तसेच दहिवडी रनर्स चे इतर सदस्य,म्हसवड आणि माण तालुक्यातील स्पर्धक बहुसंख्येने उपस्थित होते.
स्पर्धेदरम्यान माणगंगा नदीच्या पात्रात बांबू लागवड,वाकी स्मशानभूमीत वृक्षारोपण इत्यादी पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आले.
दरम्यान नदीपात्रातील झालेली वाळूची लूट पाहून पदाधिकारी अधिकारी यांनी संताप व्यक्त केला.
स्पर्धेचे उद्घाटन आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेत म्हसवड येथील सूरज लोखंडे याने प्रथम,संतोष माने याने द्वितीय,विशाल वीरकर याने तृतीय, आकाश लोखंडे याने चौथा,तर सुनिल गायकवाड याने पाचवा क्रमांक पटकावला.सर्व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक वाटप करण्यात आले.
Leave a Reply