ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मोबाईल ज्ञानाची पेटी की विषाची ?

September 21, 202113:41 PM 23 0 0

भारतीय मुलांमध्ये पॉर्न व्हिडीओ बघण्याचे प्रमाण वाढलेले आहे.पालक हवालदिल मुलांच्या मोबाईलची इंटरनेट हिस्ट्री तपासण्याची गरज.हे एकदा वाचण्यात आलेले आहे.यावर कोणीतरी प्रकाश टाकनेची किंवा पालकांच्या लक्षात आणून देणेची गरज आहे.केवळ एक पालक असलेल्या आईने त्या मुलाचा एक दिवस मोबाईल वापरला त्यावरून त्यातील इंटरनेट हिस्टरी पाहिल्या नंतर तिच्या लक्षात आले व त्या मातेने केवळ हे लपवून न ठेवता सर्व इतर समाजातील पालकांना नव्हेतर सर्व नागरिकांना समजावे म्हणून प्रकार मध्यमा पर्यंत कसा जाईल याचा प्रयत्न केलेला आहे.त्यासाठी अशा नाजूक नाजूक पण योग्य विषयाची पोलखोल करणे आजच्या काळाची गरजच आहे.
पूर्वी शाळेत किंवा आज सुद्धा मराठी शाळांमधून ” विज्ञान शाप की वरदान” या विषयावर निबंध लिहावा लागत असे.त्या काळात तशी विज्ञानाची पाहिजे एवढी प्रगती झालेली नव्हती पण आज आपल्या हातात अँड्रॉइड मोबाईल च्या माध्यमातून सारे जगच नव्हे तर विश्व माझ्या हातात आलेले आहे.तसे पाहिले तर विज्ञान संशोधन ही काळाची गरज आहे.पण त्या विज्ञानाचा आपण वापर कसा करावा यावर अवलंबून आहे.नेहमी साध्या सोप्या उदाहरणावरून सांगता येईल,जर एखाध्या काडीपेटीतील काडीचा उपयोग ज्वाला निर्माण करून गॅस,स्टोव्ह, किंवा चूल पेटवून त्याचा आपले दैनंदिन अन्न शिजवणे किंवा तयार करणेसाठी केला तर त्याच योग्य वापर काडीचा समजू शकतो व त्याच काडीचा वापर एखाद्याचे घर किंवा एखाद्याची वैरणीची गंज पेटविण्या साठी केला तर धोका आहे.
वर नमूद केलेल्या साध्या उदाहरणा वरून आपण त्या संबंधित वस्तूचा जसा वापर करू तसे त्याचे फायदे व तोटे होतात.म्हणजे या विज्ञान युगात मानवाच्या सुखा साठीच आज पर्यंतच्या शास्त्रज्ञानी चांगला विचार करूनच शोध लावलेले आहेत.पण त्याचा गैरवापर किंवा अतिरेख झाला तर त्याची झळ आपणास पोहचल्या शिवाय राहणार नाही.आजच्या विषयाकडे आपण दुर्लक्ष केले तर हा रोग सुसाट वेगाने पसरत जाईल.त्यासाठी आपण सर्व नागरिकांनी त्यावर लक्ष ठेऊन तो कसा आपल्या मुलांना यापासून परावृत्त कसे करता येईल त्याचे समुपदेशन कसे कोण कोणत्या स्थरावर म्हणजेच शाळा चर्चासत्रे आकाशवाणी ,दूरदर्शन ,दैनिके ,मासिके इत्यादी प्रसार माध्यमातून करणेचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.कारण संस्कारक्षम वयातच त्यांचेवर संस्कार केले तरच आजची पिढी उद्याचे आदर्श नागरिक होतील.वेळ निघून गेल्या नंतर त्याचा काही उपयोग होणार नाही.शासनाला सुद्धा यावर काही उपाय करता येतात का ? याचा सुद्धा शोध घेणेची गरज आहे.आज अलीकडच्या काळात बाल गुन्हेगारांची बलात्काराची जी प्रकरणे किंवा नुकतीच पालघर येथे पाच वर्षांच्या मुलीवर बारा वर्षाच्या मुलाने अत्याचार केला आहे पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतला आहे अशा घटना घडत आहेत. त्यास ही पॉर्न व्हिडीओ कारणीभूत म्हटली तर वावगे होणार नाही.


त्यासाठी पालकांनी आपल्या मुलाकडील मोबाईलची त्याचे न कळत त्यातील इंटरनेट हिस्ट्री समजावू घेणेचा प्रयत्न केला तर आपणास लक्षात आले नंतर त्यावर उपाय करता येईल.सर्वच मुले अशी असतात असे नाही पण त्या कोणा एकाला जरी यातील गुपित कळाले तर ज्याच्या पालकाच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्या मुलाच्या मार्फत मुलांच्या ग्रुप मधून वाऱ्या सारखा प्रसार होऊ शकतो नव्हे आता सर्वत्र झालेलाच आहे.त्यासाठी ज्या ज्या पालकांच्या कडे आपल्या या १२ ते १३ वर्षाच्या वयोगटातील मुलांच्या हातात चुकून पालकांच्या गैरहजेरीत मोबाईल गेला तर ज्या कोणा एका मित्राला माहिती असेल तर त्याचे मार्फत असे व्हिडीओ नक्कीच पाहणेचा प्रयत्न होत असणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.त्यासाठी पालकांनीच आता लक्ष ठेवणे गरजेचे आहे.तसेच ज्या पालकांचे कडे असला मोबाईल नसला तरी त्याचे इतर मित्र कोण आहे याचा शोध घेणे त्याचे अप्रत्यक्ष लक्ष ठेवणे ही गरज निर्माण झालेली आहे.अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या दिवसे दिवस वाढत आहे.अलीकडच्या मुलांना पालक त्याच्या सुरक्षिते साठी मोबाईल घेऊन देतात. आजची ती काळाची गरजच होऊन बसलेली आहे.याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. पण आता कोरोनाने शाळा बंद असल्याने घरीच मुले ऑनलाइन मोबाईलवर शिकत आहेत.त्यामुळे पालकांचे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झालेली आहे.
मोबाईलचा चांगला उपयोग कसा करता येईल याचा प्रयत्न किंवा संबंधितावर प्रबोधन झाले पाहिजे सुरुवातीस आपण म्हटलेले आहे.सर्व जग च माझ्या मुठीत आहे.मोबाईल जशी एक ज्ञानाची पेटी आहे तशीच ती विषाची पेटी सुद्धा तिच्या वापरावरून बदलू शकते. जसा वापर करू तसा त्याचा फायदा वा तोटा आपणास होत असतो.त्या विज्ञानातुन आपणास जे जे चांगले कसे घेता येईल याचाच मुलांचेवर संस्कार झाले पाहिजेत.उदाहरण द्यायची म्हटली तरी आपणास वेळ पुरणार नाही नव्हे तर त्या माहितीचे छोटे पुस्तक तयार होईल. आपणास कशाची मदत किंवा माहिती हवी आहे मग ती आपणास कोठे जायचे त्याचा मार्ग दाखविता येतो तर ठिकाण किती अंतरावर आहे. त्याठिकाणी किंवा किती वेळात पोहचता येईल.अशी प्रवासाची माहिती,शालेय कोणतीही माहिती,पुस्तकांची नावे,लेखकांची नावे महापुरुष यांच्या जयंती,पुण्यतिथी,चांगले लेख ,संग्रही ठेवावी अशी औषधांची माहिती, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, शेती,फळांची,त्यांचा उपयोग ,वेगवेगळे शोध ,लढाई, अशी एक नव्हे किती तरी माहिती इंटरनेटवर काही सेकंदा मध्ये समोरच्या इसमाला पाठवू शकतो किंवा त्याचे कडून घेऊ शकतो,वेगवेगळी प्रवाशांच्या साठी वाहनांची बस ,रेल्वे आरक्षण किंवा कॅशलेस पैशाचे कोट्यवधींचे व्यवहार बँकेत न जाता पैसे काढतो किंवा कोणासही घरातूनच पाठवितो,रेल्वे ,एसटी बस आरक्षण करू शकतो,सर्व प्रकारची बिले भरतो तसेच किती तरी जगातील माहिती, गायक, वादक ,करमणुकीची नाटके, गीते,चित्रपट, क्रीडा क्षेत्रातील सामने काय काय सांगावे तेवढे कमीच पडेल.त्यासाठी आधुनिक या विज्ञान युगात आपण विज्ञानाची मदत घेतलीच पाहिजे नव्हे ती आपणास घ्यावीच लागते.यास्तव सर्वाना एकच संदेश देणेचा आहे.यातील जेवढे जेवढे चांगले आहे आपल्या ज्ञानात भर टाकत अशी माहीती आहे ती घ्या.ज्या पासून आपली अल्पवयीन १२ ते १३ वर्षाचे आतील मुलं कशी बिघडणार नाही याचा प्रयत्न करा.एवढेच केवळ संबंधित पालकांनाच नव्हे तर आपणा सर्व समाजातील नागरिकांना सांगू इच्छितो. कारण शेवटी आपण प्रत्येक जण या समाजाचाच एक भाग आहे.या देशाचे आपण नागरिक आहोत.आपल्या
देशाची आजची चांगली पिढी घडवली तरच या देशात भविष्यात चांगले नागरिक निर्माण होऊन आपला देश अधिका अधिक या विज्ञान युगाचा फायदा घेऊन अधिका अधिक प्रगती केलेला भविष्यात आपणास पाहवयास मिळेल.यावरून आपल्या देशावही प्रगती करावयाची असेल तर मोबाईल ही ज्ञानाची पेटी आहे पण तिचा गैरवापर केला विषाची पेटी होऊ शकते.
लेखक
जी.एस.कुचेकर पाटील
भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा
मो.न.७५८८५६०७६१.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *